ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 21 जून : पाचोरा येथे जिल्हाध्यक्ष व्यापार आघाडी जळगाव पश्चिम भाजपा पाचोरा तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष सर्व पदाधिकारी बजरंग दल व आर. एस. एस. कार्यकर्ते यांनी भडगाव रोडवरील लाल बागचा राजा गणपती यांच्या ग्राउंडवर सकाळी 6.30 ते 7.30 वाजता योगा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विविध प्रकारचे योगासने योगासनांची माहिती राजेश मोर यांनी दिली. आलेल्या सर्व उपस्थितांना योगा शबिरासाठी काय योग्य आहे, प्रत्येक आसनाचे महत्व व योगा कसा करावा याचे प्रात्यक्षिक करुन दाखविले व त्याप्रमाणे सर्वजण योगा करीत होते.
यावेळी व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष रमेश वाणी, जिल्हा कोषाध्यक्ष कांतीलाल जैन, शहराध्यक्ष दिपक माने, सरचिटणीस जगदीश पाटील, व्यापारी आघाडी तालुकाध्यक्ष राहुल जैन, शहराध्यक्ष राजेद्र पटवारी, जिल्हा उपाध्यक्ष रविन्द्र पाटील, चिटणीस मोहन अग्रवाल, जि. कार्य सदस्य संदीप महालपुरे, रमेश शामणानी, गोटु शेठ पटवारी सर्व व्यापारी बांधव तसेच पञकार अनिल आबा येवले आदी उपस्थित होते.
उपस्थितांच्या वतीने राजेश मोर यांचा सत्कार व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेश वाणी यांनी केला व असेच मार्गदर्शन वेळोवेळी करण्याचे आव्हान केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी मुन्नाभाई अग्रवाल व राहुल जैन यांनी विशेष परिश्रम घेतले.
हेही वाचा : “मी देखील आपल्या इतकाच संतप्त आणि व्यथित, पण….”, जामनेरच्या घटनेवरून मंत्री गिरीश महाजन यांचं महत्वाचं आवाहन






