धुळे, 30 जुलै : राज्यात अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असताना धुळ्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. धुळे शहरातील गरताडबारी या भागाजवळ ट्रकचालकाने चारचाकी वाहनाला धडक दिल्याने भीषण अपघाताची घटना घडली. या दुर्घटनेत मुळचे धुळे जिल्ह्यातील रहिवासी आणि सध्या मुंबईत कार्यरत असलेले पत्रकार हर्षल भदाणे-पाटील (वय 27) यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
नेमकं काय घडलं? –
मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटक राज्यातून मध्यप्रदेशधील इंदौर कडे जाणाऱ्या भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने चारचाकी वाहनाला जोरदार धडक दिली. दरम्यान, या कारमध्ये पत्रकार हर्षल भदाणे बसले होते. दरम्यान, अनाचक झालेल्या या अपघातात हर्षद भदाणे यांनी कारमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. पण ट्रकचे पुढचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा घटनस्थळीच मृत्यू झाला. दरम्यान, या अपघातात आणखी दोन जण या गंभीर जखमी झाले आहेत.
ट्रकचालकाने घटनास्थळाहून काढला पळ अन्… –
धुळ्यात झालेल्या या अपघातानंतर भेदरलेल्या ट्रकचालकाने घटनस्थळाहून पळ काढला. पण काही नागरिक ट्रकचालकाला पकडण्यासाठी त्याचा पाठलाग करत असताना यात त्याने अन्य काही दुचाकी आणि चारचाकी वाहनांनाही चिरडल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. दरम्यान, नागरिकांनी ट्रकचालकाचा पाठलाग करत त्याला पकडले व त्याला बेदम चोप दिला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले. सध्या हा ट्रकचालक तसेच सहचालक धुळे पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा : पेट्रोलींग दरम्यान चोरी केलेले पीकअप वाहन पकडले; आरोपी ताब्यात, पिंपळगाव पोलिसांची कारवाई