जळगाव, 6 सप्टेंबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला अवघे दोन-तीन महिने शिल्लक असताना जळगाव ग्रामीण मतदारसंघातील राजकीय वातावरण आता चांगलेच तापले आहे. असे असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग वाढल्याचे दिसून आले आहे. अनेक तरूणांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटा) पक्षात प्रवेश केला आहे.
शिवसेना शिंदे गटाचे मंत्री तथा आमदार गुलाबराव पाटील हे जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे सध्या प्रतिनिधित्व करत आहेत. अशातच गेल्या दहा वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची याठिकाणी सत्ता नसतानाही राष्ट्रवादीच्या विचारधारेशी नाळ जुळलेल्या जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी त्यांचा संयम ढळू दिलेला नाही. तशात आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात मतदारसंघातील अनेक तरूणांनी पक्षप्रवेश केलाय.
यांनी केला पक्षप्रवेश –
जळगाव तालुक्यातील शेळगाव येथील निवृत्ती गोसावी, लीलाधर कोळी, तुषार कोळी, सागर धनगर, निवृत्ती कोळी, निखिल कोळी, रोहित कोळी, सागर गोसावी, कुंदन धनगर, कुंदन कोळी, संतोष कळसकर, शंकर कोळी, राज कोळी, दीपक गोसावी, हर्षल सोनवणे, दीपक कोळी या काही तरूणांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नुकताच जाहीर प्रवेश केला. पक्षाचे नेते व माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी तरूणांचे पक्षातर्फे स्वागत केले. याप्रसंगी ओबीसी सेलचे जळगाव तालुकाध्यक्ष सचिन माळी, मजूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष लीलाधर तायडे, धानवडचे उपसरपंच दिलीप चव्हाण,असोद्याचे ग्रामपंचायत सदस्य हेमंत पाटील तसेच नशिराबाद येथील बरकत अली आदी उपस्थित होते.
हेही वाचा : “अमित भाईंनी जर सांगितलं तर…….,” एकनाथ खडसेंच्या पक्षप्रवेशाबाबत मंत्री महाजन नेमकं काय म्हणाले?