जळगाव, 23 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत म्हसावद, जळगाव खुर्द, हिंगोणे खुर्द, बेळी येथील असंख्य तरूणांनी देखील राष्ट्रवादीत नुकताच प्रवेश केला. सर्वांचे पक्षाच्या वतीने गुलाबराव देवकर यांनी स्वागत केले.
जळगाव ग्रामीण मतदारसंघातील लोकप्रतिनिधी गेल्या 10 वर्षात एकही उद्योग आणू शकलेले नाही. त्यामुळे बेरोजगार तरूणांना रोजगारासाठी पुणे, नाशिक, मुंबईची वाट धरावी लागत आहे. ही स्थिती बदलण्यासाठी आगामी काळात शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभे करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी दिली. याप्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बापू परदेशी, जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ.अरूण पाटील तसेच म्हसावदचे ग्रामपंचायत सदस्य विवेक चव्हाण व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
‘यांनी’ केला पक्षात प्रवेश –
म्हसावद येथील सुमीत दिलीप भोई, रोहित विनोद भोई, सागर भिकन पाटील, तुषार राजू कुमावत, सुनील भगवान वाडीले, राजू पाटील, कल्पेश गणेश सोनवणे, रमेश जगन्नाथ कुमावत, छोटू हिरामण धनगर, योगेश धोंडू धनगर, देवेंद्र जय धोबी, धोंडू शिवलाल धनगर, हिंमतराव रामचंद्र सोनवणे, ललिताहाई हिंमतराव सोनवणे, ममताबाई रमेश कुमावत, अनुसयाबाई विठ्ठल वाडीले. तसेच जळगाव खुर्द येथील नीलेश वासुदेव पाटील, सुनील चंद्रकांत पाटील, रवींद्र दामू भारंबे, हर्षल रवींद्र पाटील, नीरज भगवान महाजन, गणेश एकनाथ भारंबे, हिंगोण खुर्द येथील जयवंत चंद्रसिंग मालचे, सुभाष बाबुलाल मोरे, नीलेश अविनाश अत्तरदे, तुराब गुलाब शाह, अजय बाळू पाटील, विजय गंभीर ठाकरे, बेळी येथील संजय जंगलू सुर्वे, तुषार पंढरीनाथ पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.
हेही वाचा : विधानसभा निवडणुकींसाठी जळगाव जिल्हा सज्ज! निवडणुकीसाठी काटेकोर नियोजन