• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

पंढपुरात आषाढी वारीसाठी येणाऱ्या 1109 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजार रूपये अनुदान, नेमकी बातमी काय?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 14, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
पंढपुरात आषाढी वारीसाठी येणाऱ्या 1109 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजार रूपये अनुदान, नेमकी बातमी काय?

मुंबई, 14 जून : आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात येणाऱ्या दिंड्यांना 20 हजार रूपये अनुदान देण्याचा हा निर्णय असून यामध्ये मानाच्या 10 पालख्यांसोबत येणाऱ्या 1109 दिंड्यांना प्रति दिंडी 20 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. याबाबत प्रशासकीय मंजुरी देखील देण्यात आली आहे.

नेमकी बातमी काय? –

महायुती सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मागील वर्षी 2024 साली पार पडलेल्या बैठकीत तिर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा सन 2024 करिता मानाच्या 10 पालख्यांसोबत येणाऱ्या प्रत्येक दिंडीला रु.20 हजार रूपये इतके अनुदान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत देण्याबाबत निर्देश दिले होते. यावेळी सन 2023-24 मध्ये विभागीय आयुक्त यांच्याकडून शासनाला एकूण 1 हजार 109 दिंड्यांची यादी प्राप्त झाली होती.

1109 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजार रूपये अनुदान –

महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या निर्णयानुसार (GR), गतवर्षीप्रमाणे यंदादेखील तिर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रेसाठी मानाच्या 10 पालख्यांसोबतच्या 1109 दिंड्यांना प्रती दिंडी रु.20 हजार रुपये याप्रमाणे एकूण 2 कोटी 21 लाख 80 हजार रुपये इतके अनुदान वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार, मानाच्या 10 पालख्यांसोबतच्या 1109 दिंड्यांना प्रती दिंडी 20 हजार रुपये अनुदान वितरीत करण्यात येणार आहे.

वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना –

आषाढी वारीचा मुख्य सोहळा रविवार 6 जुलै रोजी पंढरपूर येथे पार पडणार आहे. यासाठी प्रशासनाने आणि पोलीस यंत्रणांनी जय्यत तयारी केली असून  वारी सोहळ्यासाठी राज्य पोलीस दलातील 6,000 पोलीस कर्मचारी आणि 3,200 होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच राज्य राखीव पोलीस दलाच्या सहा तुकड्यांनाही सतर्कतेच्या दृष्टीने तैनात करण्यात आले आहे. दरम्यान, संपूर्ण पालखी मार्गावर ड्रोनच्या साहाय्याने देखरेख ठेवण्यात येणार असून कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झाल्याचे सांगितले जात आहे.


पालखी सोहळ्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

आषाढी पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. पालखी तळ, मुक्कामाच्या ठिकाणी तसेच संपूर्ण पालखी मार्गावर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. दरम्यान, सोहळ्यासाठी शासनातर्फे आवश्यक निधी देण्यात येईल, अशी ग्वाहीदेखील उपमुख्यमंत्र्यांनी दिलीय. पुणे विधानभवन येथे झालेल्या श्री क्षेत्र देहू व श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळा-2025 पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते.

 हेही वाचा : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसामुळे नुकसान; मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया, म्हणाले की, “मी स्वतः लक्ष घालून….”

बातमी शेअर करा !
Share
Tags: ashadhi waridindysmarathi newspandharpursuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव विधानपरिषद: भाजपकडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी; इच्छुकांचा हिरमोड, शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष

जळगाव विधानपरिषद: भाजपकडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी; इच्छुकांचा हिरमोड, शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष

June 1, 2026
IPL 2026 Final: विराट कोहलीचे मॅचविनिंग अर्धशतक; गुजरातचा ५ गडी राखून पराभव करत आरसीबी सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन!

IPL 2026 Final: विराट कोहलीचे मॅचविनिंग अर्धशतक; गुजरातचा ५ गडी राखून पराभव करत आरसीबी सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन!

June 1, 2026
सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page