चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
नागपूर : गेल्या अनेक दिवसांपासून ज्या मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतिक्षा होती, अखेर काल तो नागपुरातील राजभवनात पार पडला. महायुतीच्या नव्या मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार, जातीय समीकरणे कशी राखली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. काल झालेल्या या मंत्रिमंडळात अनेक दिग्गजांचा पत्ता कट झाला असून देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.
या मंत्रिमंडळात मराठा आणि ओबीसी समाजाला तुल्यबळ स्थान देण्यात आले आहे. एकूण 42 मंत्र्यांपैकी मराठा समाजाचे 16 आणि ओबीसींच्या विविध जातींचे 17 मंत्री आहेत. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ब्राह्मण समाजाचे दोन, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचे प्रत्येकी दोन, तर मुस्लीम समाजाचे एक आणि जैन समाजाचे एक मंत्री आहेत. तर ओबीसीमध्ये माळी समाजाचे दोन, कुणबी समाजाचे तीन, बंजारा समाजाचे दोन आणि वंजारी समाजाचे तीन मंत्री आहेत.
राज्य मंत्रिमंडळात कोणत्या समाजाला किती मंत्री आहेत, याची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे
मराठा समाज –
- राधाकृष्ण विखे पाटील
- चंद्रकांत पाटील
- नितेश राणे
- शिवेंद्रराजे भोसले
- मेघना बोर्डीकर
- आशिष शेलार
- एकनाथ शिंदे
- शंभूराज देसाई
- योगेश कदम
- भरत गोगावले
- प्रकाश आबिटकर
- दादा भुसे
- अजित पवार
- बाबासाहेब पाटील
- मकरंद पाटील
- माणिकराव कोकाटे,
ओबीसी समाज –
- गिरीश महाजन (गुर्जर)
- चंद्रशेखर बावनकुळे (तेली)
- पंकजा मुंडे (वंजारी)
- प्रताप सरनाईक (कुणबी)
- अतुल सावे (माळी)
- जयकुमार गोरे (माळी)
- पंकज भोयर (कुणबी)
- गणेश नाईक (आगरी)
- आकाश फुंडकर (कुणबी)
- अदिती तटकरे (गवळी)
- दत्ता भरणे (धनगर)
- धनंजय मुंडे (वंजारी)
- गुलाबराव पाटील (गुर्जर)
- संजय राठोड (बंजारा)
- इंद्रनील नाईक (बंजारा)
- आशिष जयस्वाल (कलाल)
- जयकुमार रावल (राजपूत)
मुस्लीम – हसन मुश्रीफ
जैन – मंगलप्रभात लोडा
ब्राह्मण –
- देवेंद्र फडणवीस
- उदय सामत (गौड ब्राह्मण)
खुला प्रवर्ग –
माधुरी मिसाळ (सीकेपी)
अनुसूचित जाती –
- संजय सावकारे (चर्मकार)
- संजय शिरसाट (बौद्ध)
अनुसूचित जमाती –
- अशोक उईके (आदिवासी)
- नरहरी झिरवाळ (आदिवासी)
आधी आमदारकीचा चौकार, अन् आता मिळालं कॅबिनेट मंत्रिपदाचं गिफ्ट, असा राहिलाय संजय सावकारेंचा प्रवास