जळगाव, 19 फेब्रुवारी : जळगाव जिल्ह्यातील धरणगाव पोलीस स्टेशन हद्दीत मुसळी फाटा या ठिकाणी रस्त्यावर कापूस व्यापऱ्यांकडून दीड कोटी रूपयांची चोरी करण्यात आली होती. दरम्यान, या प्रकरणातील दोन संशयित आरोपींना अटक करत 48 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती –
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी दिलेल्या माहितीनुसार, धरणगाव पोलीस स्टेशन हद्दीत मुसळी फाटा या ठिकाणी रस्ता लुटीतील दीडकोटी चोरी करणाऱ्या संशयित आरोपी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात 48 लाखांचा मुद्देमाल तसेच चार वाहने जप्त करण्यात आली आहेत.
अनिल उर्फ बंडू भानुदास कोळी (वय 32) आणि दर्शन भगवान सोनवणे (वय 29) दोन्ही रा. विदगाव ता.जळगाव अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, 4 फरार आरोपींचा पोलीस शोध घेत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक रेड्डी यांनी दिली.
काय आहे संपूर्ण प्रकरण? –
धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथील दुर्गेश इम्पेक्स जिनींगमधून शेतकऱ्यांना देण्यासाठी 1 कोटी 60 लाख रुपये घेवून तीन कर्मचारी कारने जळगावरून धरणगावला जात होते. मुसळी फाट्याजवळ दुपारच्या सुमारास त्यांच्या कारला समोरुन येणाऱ्या कारने धडक दिली. अपघातानंतर लागलीच चौघांनी चालकाच्या डोळ्यात मिरची पुड टाकत लोखंडी रॉडने मारहाण केली आणि त्यांच्याकडील 1 कोटी 60 लाखांची रोकड घेवून चोरटे तेथून पळ काढला. दरम्यान, धरणगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासातील पोलीस अधिकारी-कर्मचारी : –
तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अमोल मोरे, उपनिरीक्षक गणेश वाघमारे, कर्मचारी विजय पाटील, विजयसिंग पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, महेश महाजन, अकरम शेख, राहूल पाटील, भगवान पाटील, नंदलाल पाटील, सचिन महाजन, रफिक शेख, लक्ष्मण पाटील, सुधाकर अंभोरे, जयंत चौधरी, संदिप सावळे, किरण चौधरी, ईश्वर पाटील, लोकेश माळी, अनिल जाधव, हेमंत पाटील, राहुल बैसाणे, दर्शन ढाकणे, महेश सोमवंशी, अभिलाषा मनोरे, रजनी माळी, वैशाली सोनवणे, रवी नरवाडे, संजय हिवरकर, राजेश मेंढे, कमलाकर बागुल, संदिप पाटील, गोरख बागुल, प्रविण मांडोळे, अनिल देशमुख यांचे पथक वेगवेगळ्या दिशेने रवाना केले होते.
हेही वाचा : शिवनेरीवर शिवजन्मोत्सव साजरा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षणाबाबत काय म्हणाले ?