धुळे, 4 जानेवारी : दोन वर्षाचा मुलगा खेळत असताना खड्ड्यात पडून त्याचा मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना धुळे तालुक्यातील जुन्नर या गावात घडली. ओम सोनू पाटील, असे मृत बालकाचे नाव आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ही दुर्दैवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
नेमकं काय घडलं –
सोनू पाटील हे जुन्नर गावात आपल्या परिवारासोबत राहतात. त्यांचा दोन वर्षांचा मुलगा ओम हा सोमवारी दुपारच्या सुमारास अंगणात खेळत होता. मात्र, खेळ असताना ओम या दोन वर्षांचा मुलाचा पाय घसरला आणि तो खड्ड्यात जाऊन पडला. मात्र, यावेळी कोणीच बाहेर नव्हते.
दरम्यान, त्याच्या रडण्याचा आवाजही आला नाही. दुसरीकडे खड्ड्यात पाणी असल्याने त्यात तो बुडाला. ही घटना घरच्यांच्या लक्षात आल्यावर ओम पाटील या दोन वर्षांच्या मुलाला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ही दुर्दैवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.