चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव – राज्यातील महायुती सरकारचा बहुप्रतिक्षित असा मंत्रिमंडळ विस्तार काल नागपुर येथील राजभवनात पार पडला. यावेळी तब्बल 39 जणांनी मंत्रिमदाची शपथ घेतली. यामध्ये 33 आमदारांनी कॅबिनेट मंत्रीपदाची तर 6 आमदारांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. जळगाव जिल्ह्याचा विचार केला असता यामध्ये जळगाव जिल्ह्यातील 3 आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे या तीन जणांमध्ये 2 आमदार हे रावेर लोकसभा मतदारसंघातील आहे. त्यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघात एकूण मंत्र्यांची संख्या ही 3 झाली आहे. यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, तर राज्यातील कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन, संजय सावकारे यांचा समावेश आहे. याचबाबत सुवर्ण खान्देश लाईव्हचा हा स्पेशल रिपोर्ट.
राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा शपथविधी काल नागपूर येथील राजभवनात पार पडला. यावेळी जळगाव जिल्ह्यातील जळगाव ग्रामीणचे आमदार गुलाबराव पाटील, जामनेरचे आमदार गिरीश महाजन तसेच भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. जळगाव जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघांचा विचार केला तर जळगाव जिल्ह्यात लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत. एक म्हणजे जळगाव लोकसभा तर दुसरा म्हणजे रावेर लोकसभा मतदार संघ. यामध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघातून गुलाबराव पाटील यांच्या रुपाने राज्य मंत्रिमंडळात एक कॅबिनेट मंत्री झाले आहेत. तर रावेर लोकसभा मतदारसंघातून गिरीश महाजन आणि संजय सावकारे यांच्या रुपाने राज्य मंत्रिमंडळात दोन कॅबिनेट मंत्री झाले आहेत.
या आधी लोकसभा 2024 निवडणुकीनंतर केंद्रात एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली. त्यामध्ये खान्देशातून रावेर लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजयी झालेल्या भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांना मोदींनी आपल्या टीममध्ये संधी देत केंद्रीय राज्यमंत्रीपदाची संधी दिली. मोदींच्या टीममध्ये रक्षा खडसेंची वर्णी लागल्यानंतर जळगाव जिल्ह्याला त्यांच्या रुपाने केंद्रीय मंत्रीपद मिळाले. यानंतर आता राज्यातील महायुती सरकारचे प्रमुख देवेंद्र फडणवीसांच्या टीममध्ये रावेर लोकसभा मतदारसंघातील दोन आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळाली.
जामनेरचे आमदार आणि ज्येष्ठ नेते गिरीश महाजन हे यावेळी सातव्यांदा विजयी झाले. तर संजय सावकारे हे भाजपच्या वतीने सलग तिसऱ्यांदा तर एकूण सलग चौथ्यांदा विजयी झाले. त्यामुळे त्यांनाही राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळणार अशी शक्यता वर्तवली जात होती. यातच मंत्रिमंडळ विस्ताराआधी सावकारेंना अचानक निरोप आला. यानंतर त्यांनी काल त्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेती. अशाप्रकारे आता रावेर लोकसभा मतदारसंघातून मोदींच्या टीममध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या रुपाने 1, तर फडणवीसांच्या टीममध्ये गिरीश महाजन आणि संजय सावकारेंच्या रुपाने 2 जणांना संधी मिळाल्याने रावेर लोकसभा मतदारसंघाचे वजन वाढले आहे. तर आता जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कुणाला मिळते याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
आधी आमदारकीचा चौकार, अन् आता मिळालं कॅबिनेट मंत्रिपदाचं गिफ्ट, असा राहिलाय संजय सावकारेंचा प्रवास
नव्या मंत्रिमंडळात 16 मराठा, तर 17 ओबीसी समाजाचे मंत्री; वाचा, संपूर्ण यादी, एका क्लिकवर..