• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

VIDEO | जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; 8 गुन्ह्यांतील तब्बल 1 कोटी 86 लाख रुपयांचा 930 किलो 820 ग्रॅम गांजा केला नष्ट

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 7, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम, जळगाव शहर, ताज्या बातम्या
VIDEO | जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; 8 गुन्ह्यांतील तब्बल 1 कोटी 86 लाख रुपयांचा 930 किलो 820 ग्रॅम गांजा केला नष्ट

जळगाव, 7 जुलै: जळगाव जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधातील कारवाईला आणखी बळ देत जळगाव पोलिसांनी विविध पोलीस ठाण्यांत दाखल असलेल्या आठ गुन्ह्यांमधील तब्बल 930 किलो 820 ग्रॅम सुका गांजा नष्ट केला. या जप्त गांजाची अंदाजित किंमत 1 कोटी 86 लाख 16 हजार 400 रुपये इतकी आहे. याबाबतची माहिती जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे.

जळगाव पोलिसांची मोठी कारवाई –

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, केंद्र शासन तसेच महाराष्ट्र पोलीस महासंचालक आणि विशेष पोलीस महानिरीक्षक (ANTF) यांच्या सूचनांप्रमाणे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेल्या अंमली पदार्थांचा तातडीने नाश करण्याचे आदेश देण्यात आले होते.

त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तथा अंमली पदार्थविरोधी पथकाचे नोडल अधिकारी राहुल गायकवाड यांनी केंद्रीय मुद्देमाल कक्षात जमा असलेल्या जप्त अंमली पदार्थांचा आढावा घेतला. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेल्या आठ गुन्ह्यांतील गांजा नष्ट करण्यासाठी जिल्हास्तरीय अंमली पदार्थ मुद्देमाल नाश समितीकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. समितीने पडताळणी करून त्यास मंजुरी दिली.

View this post on Instagram

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)


त्यानंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या इमारतीमागील मोकळ्या जागेत जिल्हास्तरीय अंमली पदार्थ नाश समितीच्या उपस्थितीत संपूर्ण प्रक्रिया पार पडली. पर्यावरणाची कमीत कमी हानी होईल, याची काळजी घेत खड्डा खोदून गांजाचा नाश करण्यात आला. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात आले.

ही कारवाई अंमली पदार्थांविरोधातील पोलिसांच्या कठोर भूमिकेचे द्योतक मानली जात असून, भविष्यातही अशाच प्रकारे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेल्या अंमली पदार्थांचा नाश करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

यांनी केली कारवाई –

सदरची नाश प्रक्रिया पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय अंमली पदार्थ नाश समितीच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, पोलीस उपअधीक्षक (गृह) संजय गायकवाड, कृषी विभागाचे प्रतिनिधी विकास बोरसे तसेच वजन-मापे विभागाचे निरीक्षक गौतम बाविस्कर उपस्थित होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार संजय दोरकर तसेच पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप पाटील, संदीप चव्हाण, जयंत चौधरी आणि राहुल बैसाणे यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.

VIDEO | जळगाव जामोद येथील अज्ञात महिला मृत्यू प्रकरण; ‘जय भीम’ चित्रपटाचा संदर्भ देत आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न

बातमी शेअर करा !
Share
Tags: cannabis destroyedjalgaon district crime newsjalgaon newsjalgaon policesuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जनजागृती शिबिर; डेंग्यू, हिवतापासह जलजन्य आजार, कुष्ठरोग व एचआयव्ही-एड्सबाबत मार्गदर्शन

चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जनजागृती शिबिर; डेंग्यू, हिवतापासह जलजन्य आजार, कुष्ठरोग व एचआयव्ही-एड्सबाबत मार्गदर्शन

August 22, 2026
तारखेडा रेल्वे गेट व शेतकरी रस्ता बंद; खासदार स्मिता वाघ यांची पाहणी, पर्यायी व्यवस्था करण्याच्या रेल्वे प्रशासनाला सूचना

तारखेडा रेल्वे गेट व शेतकरी रस्ता बंद; खासदार स्मिता वाघ यांची पाहणी, पर्यायी व्यवस्था करण्याच्या रेल्वे प्रशासनाला सूचना

August 22, 2026
व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

August 22, 2026
‘ग्रामसभा कमी नको, अधिक सक्षम करा;’ ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या मागणीला हरकत

‘ग्रामसभा कमी नको, अधिक सक्षम करा;’ ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या मागणीला हरकत

August 22, 2026
पेलेट गन हल्ला प्रकरण; राहुल गांधींचे दिल्लीत आंदोलन अन् अखेर दिल्ली पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्याची तयारी

पेलेट गन हल्ला प्रकरण; राहुल गांधींचे दिल्लीत आंदोलन अन् अखेर दिल्ली पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्याची तयारी

August 21, 2026
उद्योजकांनी स्थानिक युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी देऊन विकासाला गती द्यावी — पालकमंत्री गुलाबराव पाटील

उद्योजकांनी स्थानिक युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी देऊन विकासाला गती द्यावी — पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 21, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page