ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 7 जुलै: जळगाव जिल्हा ग्रंथालय संघाच्या संचालक पदी डॉ. यशवंत प्रकाश पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तसेच संघाच्या कार्यवाह पदी गणेश रणसिंग देशमुख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. या दोन्ही निवडींमुळे जिल्हा ग्रंथालय क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
जिल्ह्यातील ग्रंथालय चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी आणि ग्रंथालयांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी या दोन्ही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा दांडगा अनुभव अत्यंत फायदेशीर ठरेल, असा विश्वास ग्रंथालय वर्तुळातून व्यक्त केला जात आहे.
पाचोरा तालुका ग्रंथालय संघाकडून शुभेच्छा –
या सुवर्णमयी निवडीचे पाचोरा तालुका ग्रंथालय संघ (पाचोरा, जिल्हा जळगाव) यांच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. पाचोरा तालुका ग्रंथालय संघाच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी डॉ. यशवंत प्रकाश पाटील आणि कार्यवाह गणेश रणसिंग देशमुख यांचे जाहीर अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील यशस्वी कार्यकाळासाठी भावपूर्ण शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा: लोकमाता अहिल्यादेवी होळकर “जीवन गौरव पुरस्काराने” पत्रकार प्रमोद बारी यांचा सन्मान






