• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

“उठाव केला नसता तर….” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं दसरा मेळाव्यात जोरदार भाषण, नेमकं काय म्हणाले?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 12, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या, ब्रेकिंग
“उठाव केला नसता तर….” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं दसरा मेळाव्यात जोरदार भाषण, नेमकं काय म्हणाले?

मुंबई, 12 ऑक्टोबर : शिवाजी पार्कवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा पार पडता असताना दुसकरीकडे मुंबईतील आझाद मैदानावर शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. या दसरा मेळाव्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण करत ठाकरे गटावर जोरदार प्रहार केलाय. आम्ही हा उठाव केला नसता तर सच्चा शिवसैनिकांचा अपमान झाला असता आणि महाराष्ट्र अनेक वर्षे मागे गेला असता, असे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. दरम्यान, येणाऱ्या काळात महाराष्ट्रावर शिवरायांचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले? –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दसरा मेळाव्यात बोलताना म्हणाले की, गेल्या दोन वर्षात, कमी काळात हे सरकार लाडके सरकार झाले आहे. लाडक्या बहिणींचे, भावांचे, शेतकऱ्यांचे लाडके सरकार झाले आहे. अन्यायाला लाथ मारा, अशी बाळासाहेबांची शिकवण होती. त्यामुळेच, त्या विरोधात लढण्यासाठी आम्ही उठाव केला. दरम्यान, आम्ही हा उठाव केला नसता तर सच्चा शिवसैनिकांचा अपमान झाला असता आणि महाराष्ट्र अनेक वर्षे मागे गेला असता, असे शिंदे यावेळी म्हणाले.

ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली जाण्यावरून सातत्याने टीका केली जाते. या टीकेला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पंतप्रधानांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलाय. त्यादिवशी आशाताई यांनी देखील आमच्या सरकारचे कौतुक केले. सरकारची योजना गोरगरिबांना मदत करणारी आहे. आणि म्हणून आम्ही दिल्लीला जातो ते फक्त प्रकल्प आणण्यासाठी. परंतु, मला मुख्यमंत्री करा असे सांगायला जात नाही. दरम्यान, या सरकारने आधीच्या दसरा मेळाव्याला शपथ घेतली होती आणि मराठा समाजाला आरक्षण देणार. तसेच आम्ही ताबडतोब आरक्षण दिले असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.

‘यांच्या’ अहंकारामुळे राज्याच्या तिजोरीवर कर्ज –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, तुमच्या तोंडाला लागलेले शेण असे लपणार नाही. आम्ही रस्त्यावर फिरत होतो तसेच रुग्णांना मदत करत होतो. परंतु, तुम्ही घरात बसून कोविड टेस्ट करत होता. कोणी भेटायला आले त्याला बाहेर काढले आणि हे मुख्यमंत्र्यांचे काम नाही, असे सांगितले. मात्र, तुम्ही काय काम केले ते चार चौघात सांगू शकणार नाही. दरम्यान, योग्य वेळ येईल तेव्हा नक्कीच सांगू. यांच्या अहंकारामुळे राज्याच्या तिजोरीवर 17 हजार कोटींचे कर्ज वाढले. ते वाचले असते तर आज मी लाडक्या बहिणींना 3 हजार दिले असते, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

कॅबीनेट मंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले? –
कॅबीनेट मंत्री गुलाबराव पाटील दसरा मेळाव्यात बोलताना म्हणाले की, या राज्यात 20 वर्षांपासून मी आमदार आहे. मी सुद्धा बरेच मुख्यमंत्री पाहिले आहेत. एक वर्षात तब्बल 14 वेळेस मुख्यमंत्री कोणी जिल्ह्यात आणायचे काम केले असेल तर ते एकनाथ शिंदे यांनी केले आहे. दरम्यान, कावळा कितीही उंचीवर गेला तरी तो कबूतर बनत नाही, हे मी संजय राऊतला सांगतोय. कोण जिंकणार आणि कोण हारणार हे तर वेळ सांगेन, असेही मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

हेही पाहा : सुवर्ण खान्देश लाईव्ह Conclave 2024 : महाराष्ट्राच्या नवदुर्गा विशेष, महिला सुरक्षेवर मान्यवरांचं परखड मत, VIDEO

बातमी शेअर करा !
Share
Tags: cm eknath shindeeknath shinde criticseknath shinde critics on uddhav thackerayeknath shinde dasara melawa speecheknath shinde in dasara melawaeknath shinde on azad maidan in mumbai

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोरा येथे उद्या 1 मे रोजी स्पर्धा परीक्षा व पोलीस भरतीतील यशस्वींचा भव्य सत्कार

पाचोरा येथे उद्या 1 मे रोजी स्पर्धा परीक्षा व पोलीस भरतीतील यशस्वींचा भव्य सत्कार

April 30, 2026
Breaking! अमळनेर तालुक्यातील नगावच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याला जळगाव ACB ने लाच घेताना पकडले रंगेहात

Breaking! अमळनेर तालुक्यातील नगावच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याला जळगाव ACB ने लाच घेताना पकडले रंगेहात

April 30, 2026
“…तर पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतकरी सक्षम होईल!” , ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ संकल्पनेबाबत आमदार किशोर आप्पा पाटील यांचे महत्वपुर्ण भाष्य

“…तर पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतकरी सक्षम होईल!” , ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ संकल्पनेबाबत आमदार किशोर आप्पा पाटील यांचे महत्वपुर्ण भाष्य

April 30, 2026
तापी परिसरातील पहिले शासनमान्य डायलिसिस सेंटर रावेरला; उद्या ऑनलाईन लोकार्पण, आमदार अमोल जावळे यांच्या पाठपुराव्याला यश

तापी परिसरातील पहिले शासनमान्य डायलिसिस सेंटर रावेरला; उद्या ऑनलाईन लोकार्पण, आमदार अमोल जावळे यांच्या पाठपुराव्याला यश

April 30, 2026
महाडीबीटीद्वारे प्रमाणित बियाणे वितरणासाठी ऑनलाईन अर्ज सुरू; शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

महाडीबीटीद्वारे प्रमाणित बियाणे वितरणासाठी ऑनलाईन अर्ज सुरू; शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

April 30, 2026
Update: बच्चू कडूंचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश अन् विधानपरिषद आमदारकीसाठी दाखल केला अर्ज

Update: बच्चू कडूंचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश अन् विधानपरिषद आमदारकीसाठी दाखल केला अर्ज

April 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page