जालना, 2 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले असून ते नेमका काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असताना मनोज जरांगे पाटील उमेदवार आणि मतदारसंघ घोषित करणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटलांचा उमेदवार कोण आणि त्याचा मतदारसंघ कोणता? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उद्या घेणार मोठा निर्णय? –
मनोज जरांगे पाटील हे 31 ऑक्टोबर रोजी त्यांची भूमिका स्पष्ठ करणार असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, त्यावेळी त्यांनी या निवडणुकीसाठी मराठा, मुस्लिम आणि दलित म्हणजेच MMD चा फॉर्म्युला दिला. मराठ्यांसोबत आता मुस्लिम आणि दलित मतांची मोट बांधून सत्ताधाऱ्यांना दणका देण्याचा इरादा त्यांनी बोलून दाखवला. दरम्यान, ते आता उद्या 3 नोव्हेंबर रोजी उमेदवार आणि मतदारसंघ घोषित करणार आहेत.
मनोज जरांगे यांचा फॉर्म्युला नेमका काय? –
मनोज जरांगे पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, आमच्या तिघांचे मराठा, दलित, मुस्लिम समीकरण जुळले असून त्यासंदर्भात कुठले मतदारसंघ सोडायचं यावरती आज चर्चा होईल. हे समीकरण होत असताना महाराष्ट्रातील सर्वाना फॉर्म भरायला सांगितले होते. त्यामुळे एकजण द्यावे लागणार आहेत आणि बाकीच्यांना अर्ज माघे घ्यावे लागणार आहेत. म्हणजेच आजच उद्याच्या बैठकीची आणि उमेदवार घोषणेची तयारी करण्यात येणार आहे. दरम्या, उद्या लवकरात लवकर उमेदवार जाहीर करण्याचा त्यांचा नियोजन असल्याची माहिती समोर आली आहे.