• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

‘त्यांना’ यावेळी असे पाडा की ते पुन्हा कधीच उठणार नाही; ठाकरेंच्या शिवसेनेचे शरद कोळी यांची भोकरच्या सभेत गर्जना

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 16, 2024
in ताज्या बातम्या, जळगाव जिल्हा
‘त्यांना’ यावेळी असे पाडा की ते पुन्हा कधीच उठणार नाही; ठाकरेंच्या शिवसेनेचे शरद कोळी यांची भोकरच्या सभेत गर्जना

जळगाव, 16 नोव्हेंबर : जात प्रमाणपत्रासाठी कोळी समाज बांधवांनी जळगाव शहरात तब्बल 20 दिवस आमरण उपोषण करून न्याय मागितला होता. त्यावेळी तुमचे आमदार झोपा काढत होते का, असा सवाल उपस्थित करून ‘त्यांना’ यावेळी असे पाडा की ते पुन्हा कधीच उठणार नाही, अशी गर्जना शिवसेना ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी केली.

शरद कोळी यांची महायुतीवर जोरदार टीका –
महाविकास आघाडीचे जळगाव ग्रामीणमधील उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचारार्थ भोकर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात बोलताना उद्धव सेनेचे फायर ब्रॅन्ड नेते शरद कोळी यांनी महायुतीवर जोरदार टीकास्त्र सोडले. पालकमंत्र्यांवर देखील त्यांनी निशाणा साधला. ज्याच्याकडे कधीकाळी साधी मोटारसायकल नव्हती, त्याच्याकडे करोडोंची संपत्ती कुठुन आली, असा सवाल उपस्थित केला.

मंत्र्यांनी केलेल्या कारनाम्यांची चौकशी लावू –
जळगाव ग्रामीणच्या विकासासाठी निधी आणला म्हणतात, मग विकास गेला कुठे. या मतदारसंघाला कीड लागली आहे. हाताला काम नसल्याने तरूण व्यसनाधीन झाले आहेत. तुम्ही गुलाबराव देवकरांना आमदार करा, आम्ही त्यांना मंत्री करू आणि जळगाव ग्रामीणमधील आताच्या मंत्र्यांनी केलेल्या कारनाम्यांची चौकशी लावू. त्यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल करू, असाही इशारा शरद कोळी यांनी भोकर येथील सभेत बोलताना दिला.

भोकरच्या पुलाचे उद्घाटन मीच करणार : गुलाबराव देवकर
तापी नदीवरील भोकर-खेडीभोकरी दरम्यानच्या पुलाचे काम गेल्या दोन पंचवार्षिकपासून रखडले आहे. हा पूल आम्हीच पूर्ण करू आणि त्याचे उद्घाटन देखील आम्हीच करू, असे माजी मंत्री गुलाबराव देवकर म्हणाले. जळगाव ग्रामीण मतदारसंघ 10 वर्षात पिछाडीवर पडला आहे. कोळी समाजाला प्रत्येक निवडणुकीत जात प्रमाणपत्राचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले गेले. मात्र, पुढे काहीच हालचाल झाली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, विधानसभा क्षेत्रप्रमुख रमेश पाटील, उपजिल्हा प्रमुख प्रा.भाऊसाहेब सोनवणे, लक्ष्मण पाटील (लकी टेलर), शिंदे सेनेचे तालुका प्रमुख उमेश पाटील, राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, जिल्हा समन्वयक वाल्मीक पाटील, किसान सेलचे रवींद्र पाटील, भोकरचे माजी सरपंच हरीश पवार आदी उपस्थित होते. लक्ष्मण पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

हेही वाचा : भडगाव : 102 वर्षांच्या आजींनी बजावला मतदानाचा हक्क, मतदानानंतर सोडले प्राण 

बातमी शेअर करा !
Share
Tags: gulabrao deokargulabrao patiljalgaon graminsharad koliShivsena UBTsuvarna khandesh livevidhansabha election 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 11, 2026
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page