मुंबई, 3 नोव्हेंबर : नव्या सरकारमधील मुख्यमंत्री-मंत्र्यांच्या शपथविधीसाठी आझाद मैदानावर तयारी सुरू आहे. या तयाराचा आढावा घेण्याासाठी भाजप नेते आझाद मैदानावर गेले होते. यावेळी शिंदे गटातील नेते अनुपस्थित असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, यावर गुलाबराव पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले? –
मुंबईत गुलाबराव पाटील आज सकाळी माध्यमांसोबत बोलताना म्हणाले की, एकनाथ शिंदे हे आजारी असल्याने आम्हाला बाकीच्या गोष्टी महत्वाच्या वाटत नव्हत्या. कारण, “सर सलामत तो पगडी हजार…आमचा नेते आजारी होते आणि ते आमच्यासाठी महत्वाचे होते. आता त्यांचा आदेश आल्यानंतर आम्ही सर्व गोष्टी करू.
View this post on Instagram
आमच्या युतीला कोणीही तोडू शकत नाही –
अजित पवार यांना समोर ठेऊन भाजपकडून शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातोय का? यावर बोलताना गुलाबराव पुढे म्हणाले की, एकनाश शिंदे पहिल्यापासून भाजपसोबत आहेत. भाजपसाठी आम्ही केलंय आणि भाजपने आमच्यासाठी केलंय. त्यामुळे हिंदुत्वाच्या आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी तयार झालेली युती आहे. ही सहज झालेली नाहीये. विचारांची ही युती आहे. दरम्यान, यामुळे आमच्या युतीला कोणीही तोडू शकत नाही, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.
अमोल मिटकरींच्या टीकेला प्रत्युत्तर –
अमोल मिटकरी यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली होती. यावर प्रत्युत्तर देताना गुलाबराव पाटील म्हणाले की, अमोल मिटकरी हे आयुष्यात कधी ग्रामपंचायतीची निवडणूक जिंकून आलेले नाहीत. ते विधान परिषदेत आहेत. आम्ही पाच-पाच वेळेस निवडून आलेलो आहोत. असे असताना ते प्राध्यापक आहेत. यामुळे त्यांनी आधीच विषय समजून घेतला पाहिजे. विना विषय समजून घेण्याआधी मी फार हुशार आहे, हे सांगणे उचीत नाहीये.
मी किंतु-परंतुबाबत बोललो होतो. कदाचित अजित दादा आले नसते तर आम्हाला जास्त जागा लढायला मिळाल्या असत्या आणि आमच्या जास्त जागा आल्या असत्या. दरम्यान, अमोल मिटकरींनी जुलाबरावसारखे होऊ नका, अशीही टीका केली होती. यावर जुलाब झाल्यावर त्यांच्याकडे पँट देऊ, अशा खोचक शब्दात गुलाबराव पाटील यांनी मिटकरींच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
हेही वाचा : ‘राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून अॅक्शन मोडवर;’ राहुल शेवाळे यांची माहिती