• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

400 वर्षांची परंपरा, उद्यापासून सावखेडा येथील भैरवनाथ यात्रोत्सवाला सुरुवात, असे आहे यंदाचे नियोजन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 4, 2025
in पाचोरा, ताज्या बातम्या
savkheda yatra taluka pachora

400 वर्षांची परंपरा, उद्यापासून भैरवनाथ यात्रोत्सवाला सुरुवात, असे आहे यंदाचे नियोजन

ईसा तडवी, प्रतिनिधी

सावखेडा (पाचोरा) – पाचोरा तालुक्यातील सावखेडा येथील श्री भैरवनाथ देवस्थान यात्रोत्सवाला उद्या 5 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. श्री भैरवनाथ देवस्थान हे पाचोरा येथील पंचक्रोशीतील लोकदैवत आहे. त्यामुळे भैरवनाथ संस्थान तर्फे यात्रोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

पाचोरा तालुक्यातील बहुळा, खटकाळ आणि उतावळी नदीच्या त्रिवेणी संगमावर श्री क्षेत्र भैरवनाथ देवस्थान हे जागृत देवस्थान आहे. याठिकाणी परंपरेनुसार पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी हा यात्रोत्सव साजरा होत असतो. या मंदिरात 85 वर्षांचे पुजारी रामचंद्र बाबा हे काम पाहतात. यावर्षी जानेवारी महिन्यातील 5, 12, 19 आणि 26 जानेवारीला हा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.

यात्रोत्सवाला 400 वर्षांची परंपरा –

पाचोरा तालुक्यातील सावखेडा येथील श्री भैरवनाथ देवस्थान यात्रोत्सवाला 400 वर्षांची परंपरा आहे. या यात्रेचे नियोजन हे भैरवनाथ देवस्थान समितीच्या वतीने केले जाते. पौष महिन्याच्या शेवटच्या सोमवारी कुस्त्यांची दंगल होईल आणि त्यानंतर सायंकाळी देवस्थानापासून भैरवनाथ पालखी मिरवणूक काढली जाते.

Success Story : भाऊ-बहिणीची सैन्यदलात निवड;  वरखेडी येथील एकाच कुटुंबातील 4 भावंडं देशसेवेसाठी सज्ज

या देवस्थानास तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत ब दर्जा प्राप्त आहे. तसेच मंदिर बांधकामासाठी भक्तनिवास, पिण्याच्या पाण्याची सोय, मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यात आली आहेत. येथील देवस्थान परिसरात 11 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तसेच विकासकामे आजही सुरूच आहेत.

यात्रेला पंचक्रोशीतील भाविकांची प्रचंड गर्दी –

दरम्यान, सावखेडा येथील यात्रोत्सवाला शनिवारपासूनच सुरुवात होते. यात्रोत्सवा काळात भाविकांची प्रचंड गर्दी याठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे या कालावधीत पाचोरा, जळगाव, जामनेर, चाळीसगाव आगारातून भाविकांसाठी जादा बसची सुविधा पुरवली जाते.

बातमी शेअर करा !
Share
Tags: pachorapachora newsSavkhedaSavkheda Yatra

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Election Results 2026: देशातील 5 राज्यांसह बारामती, राहुरी पोटनिवडणुकीचा आज निकाल, मतमोजणीला सुरूवात

Election Results 2026: देशातील 5 राज्यांसह बारामती, राहुरी पोटनिवडणुकीचा आज निकाल, मतमोजणीला सुरूवात

May 4, 2026
नसरापूर प्रकरणी आरोपीस फाशीच्या शिक्षेसाठी प्रयत्न; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

नसरापूर प्रकरणी आरोपीस फाशीच्या शिक्षेसाठी प्रयत्न; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

May 4, 2026
VIDEO | मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना; पाचोरा-भडगाव मतदारसंघातील पहाण येथे जळगाव जिल्ह्यातील पहिल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

VIDEO | मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना; पाचोरा-भडगाव मतदारसंघातील पहाण येथे जळगाव जिल्ह्यातील पहिल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

May 3, 2026
माउंट आबू राष्ट्रीय मीडिया संमेलनाचा शुभारंभ: ‘वैश्विक शांततेची गरज – मीडियाची भूमिका’ या विषयावर चर्चा

माउंट आबू राष्ट्रीय मीडिया संमेलनाचा शुभारंभ: ‘वैश्विक शांततेची गरज – मीडियाची भूमिका’ या विषयावर चर्चा

May 3, 2026
किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 22 | संस्थात्मक आठवणी : सचिन तेंडुलकर आणि लोकभवन

किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 22 | संस्थात्मक आठवणी : सचिन तेंडुलकर आणि लोकभवन

May 2, 2026
पाचोऱ्याच्या कमलेश सोनवणेला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते यंदाचा जिल्हा युवा पुरस्कार प्रदान

पाचोऱ्याच्या कमलेश सोनवणेला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते यंदाचा जिल्हा युवा पुरस्कार प्रदान

May 2, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page