• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावात ठाकरे सेनेला मोठा धक्का, महिला आघाडी संघटक महानंदा पाटील यांचा पक्षाला जय महाराष्ट्र!

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 7, 2025
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
Jalgaon District Mahila Aghadi sanghatak mahananda patil left shivsena ubt party

जळगावात ठाकरे सेनेला मोठा धक्का, महिला आघाडी संघटक महानंदा पाटील यांचा पक्षाला जय महाराष्ट्र!

जळगाव : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जळगावमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता. शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचा जळगाव जिल्ह्यात दारुण पराभव झाला. दुसरीकडेच दोन दिवसांपूर्वीच धुळे जिल्ह्याचे शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख आणि माजी जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आपल्या शेकडो कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. यानंतर आता जळगाव जिल्ह्यात ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे.

विधानसभेच्या निवडणुकीत जिल्हाप्रमुखांनी पक्ष सोडल्यानंतर आता पक्षाच्या महिला जिल्हा संघटक महानंदा पाटील यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. पक्षात अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. तसेच पक्षाचे काम करूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप महानंदा पाटील यांनी केला आहे. त्यामुळे महानंदा पाटील यांनी आपला दोन पानांचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविला आहे.

VIDEO : Mla Amol Patil : पहिलंच अधिवेशन, शेतकरी केंद्रस्थानी, एरंडोलच्या आमदारांशी नागपूर येथून विशेष संवाद

राजीनामा पत्रात काय म्हटलं –

महानंदा पाटील यांनी आपल्या या राजीनामा पत्रात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले की, विधानसभा निवडणुकीच्या आधी झालेल्या बैठकीत पक्षाच्या प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांकडून भर मेळाव्यात अपमानास्पद वागणूक देण्यात आली. याबाबत इतर महिला पदाधिकाऱ्यांकडे याबाबतची तक्रार केली असता, त्यांच्याकडूनही तशीच वागणूक देण्यात आली.

तसेच संपर्कप्रमुख संजय सावंत यांची भेट घेतानाही अनेक वेळा बसूनही भेट दिली जात नव्हती. त्यामुळे पक्षाचे कोणतेही पद ठेवण्याची इच्छा नसल्याचे सांगत महानंदा पाटील यांनी पश्न सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, आता जळगाव जिल्ह्यात आधीच विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचा दारुण पराभव झाल्यामुळे महानंदा पाटील यांनीही राजीनामा दिल्यानंतर आता ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्याने आता ठाकरे गटासमोर पक्षबांधणीचे मोठे आव्हान आहे.

VIDEO : Raju Mama Bhole : जळगाव शहराच्या विकासासाठी राजूमामांचं व्हिजन काय, नागपूर येथून विशेष संवाद

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon newsjalgaon politicsjalgaon shivsenamahananda patilshivsena jalgaonshivsena newsubt

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 11, 2026
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page