पुणे – 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे औचित्य साधून सरहद ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज गुजर- निंबाळकरवाडी शाखेमध्ये “मिष्टी गोष्टी” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून कलाकार, दिग्दर्शक, रंगभाषा कला अकादमीचे संस्थापक अमृत श्रीधर सामक हे होते. यावेळी त्यांनी आपल्या मधुर वाणीने मुलांना मंत्रमुग्ध केले. तसेच प्रेरणादायी गोष्टींचा खजिना मुलांपुढे उघडला.
व. पु. काळे त्याचबरोबर मराठी लेखकांचा मुलांना गोष्टीरूपाने नव्याने परिचय करून दिला. मुलांनी या खजिण्याचा मनमुराद आनंद लुटला. मुलांमध्ये गोष्टींच्या माध्यमातून समाज जागृती व्हावी, तात्पर्य समजून घेऊन मुलांच्या वागण्यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये बदल व्हावा हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेच्या सचिव सुषमा नहार मॅडम, संस्थेचे विश्वस्त शैलेश वाडेकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका निर्मला नलावडे यांनी केले. या कार्यक्रमास पर्यवेक्षिका मनिषा वाडेकर व प्राथमिक विभाग प्रमुख कोमल दिवटे उपस्थित होत्या.
ज्या उद्देशाने मुलांसाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता तो उद्देश सफल झाला, अशी भावना यावेळी मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रजनी माटे यांनी केले. यानंतर शशिकला रांजणेयांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
हेही वाचा – दिल्लीला येणाऱ्या महाराष्ट्रातील साहित्य रसिकांसाठी विशेष रेल्वेच्या मागणीला मंजुरी