भुसावळ : पाचोरा येथे रेल्वेच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या कामासाठी 1 आणि 4 फेब्रुवारी रोजी जवळपास 8 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यासोबतच मुंबईहून सुटणाऱ्या 3 गाड्या उशिराने धावणार आहेत.
आज 1 आणि 4 फेब्रुवारी रोजी रद्द करण्यात आलेल्या गाड्या –
पाचोरा येथे रेल्वेच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे 8 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रद्द करण्यात आलेल्या गाड्या पुढीलप्रमाणे –
गाडी क्र. 01211 – बडनेरा-नाशिक एक्स्प्रेस,
गाडी क्र. 01212 – नाशिक-बडनेरा एक्स्प्रेस,
गाडी क्र. 11113 – देवळाली-भुसावळ एक्स्प्रेस आणि
गाडी क्र. 11114 – भुसावळ-देवळाली एक्स्प्रेस.
यासोबतच पाचोरा येथील या कामामुळे काही गाड्या मुंबई येथून उशिराने सुटणार आहेत. यामध्ये मंगळवारी 4 फेब्रुवारी रोजी गाडी क्र. 12859 मुंबई-हावडा गीतांजली एक्सप्रेस मुंबई येथून दोन तास उशिराने सुटेल. तर गाडी क्र. 22129 लोकमान्य टिळक टर्मिनस-अयोध्या कैंट एक्सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दोन तास उशिराने सुटेल.
तर गाडी क्र. 15017 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपुर एक्सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस येथून एक तास उशिराने सुटणार आहे, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.