मिलिंद वाणी, प्रतिनिधी
चोपडा, 2 फेब्रवारी : चोपड्यात बेकायदेशीररित्या अवैध्य गावठी बनावटी कट्टा व जिवंत काडतुस आढळून आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून त्यांच्याकडून 1 लाख 36500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
काय आहे संपूर्ण घटना –
लासुर ते हातेड रस्त्याने एक काळ्या रंगाची प्लसर गाडी क्र. एमएच 12 आरआर 6660 ही येत असुन त्यावरील दोन इसम हे बेकायदेशीररित्या अवैध्य गावठी बनावटी कट्टा व जिवंत काडतुस वाहतुक करुन घेवुन जात आहे, अशी गुप्त बातमी 31 जानेवारी रोजी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक, शेषराव नितनवरे यांना मिळाली होती.
ही माहिती मिळताच चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक, शेषराव नितनवरे, वपोलीस अंमलदार यांनी लासुर ते हातेड रोडवर पाटचारी जवळ दोन पंचासमक्ष जावुन सापळा लावुन दिनांक 31 जानेवारी रोजी सायंकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास बजाज प्लसर गाडी क्रमांक एमएच 12 आरआर 6660 अशी येताना दिसली.
यावेळी या मोटर सायकल चालकास हाताचा इशारा देवुन थांबविले असता त्यावरील चालकास पंचासमक्ष त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव नौफील रब्बानी सैय्यद (वय-22 वर्ष, रा. सैय्यद नगर हडपसर गल्ली नं 4(A), लिब्रा शाळेजवळ ता.जि.पुणे) व त्यापाठीमागे बसलेल्या इसमास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव अजय अशोक वाघमारे (वय-24 वर्ष, रा. सलगर ता. तुळजापुर, जि. उस्मानाबाद, ह. मु. नेवाळे वस्ती चिखली ता.हवेली जि.पुणे) असे सांगितले.
यानंतर त्यांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे बेकायदेशीर एक गावठी बनावटी कट्टा, 3 जिवंत काडतुस असे मिळुन आला. यासोबतच त्यांच्याकडून पोलिसांनी दोन मोबाईल फोन, 500/- रुपये रोख व बजाज प्लसर गाडी क्रमांक एमएच 12 आरआर 6660 असा एकुण 1,36,500/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
दोन्ही आरोपी हे एक गावठी बनावटी कट्टा, 03 जिवंत काडतुस असे त्यांचे ताब्यातील मोटर सायकलने बेकायदेशीरित्या विनापरवाना वाहतुक करतांना मिळुन आल्याने पोकॉ/1213 विशाल पाटील यांच्या फिर्यादीवरुन चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आर्म अॅक्ट
कलम 3/25,7/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या गुन्हयांचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक, शेषराव नितनवरे, पोकॉ/2243 किरण पारधी हे वरिष्ठाचे मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव परिमंडळ कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी चोपडा उपविभाग अण्णासाहेब घोलप, पोलीस निरीक्षक चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक, शेषराव नितनवरे, पोना/3094 शशिकांत पारधी, पोकॉ/2243 किरण पारधी, पोकॉ/1213 विशाल पाटील, पोकॉ/1256 चेतन महाजन अशांनी मिळून केली आहे.
हेही वाचा – Jalgaon Crime News : अल्पयवीन मुलीवर लैंगिक अत्याचार, 14 वर्षीय मुलगी प्रसूत, जळगावातील संतापजनक घटना