नंदुरबार, 8 फेब्रुवारी : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या संकल्पनेतून राज्यभरात “संवाद चिमुकल्यांशी” अभियान राबवला जात आहे. या अभियानांतर्गत शहादा-तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी शासकीय आदिवासी अमोनी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसोबत एक रात्र मुक्काम करत विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला.
“संवाद चिमुकल्यांशी” अभियान –
आदिवासी समाजाच्या शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन एक महत्त्वाचे अभियान राबवित आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील अडचणी, त्यांच्या सुरक्षिततेची हमी आणि उपलब्ध सुविधांची गुणवत्ता याबाबत माहिती मिळवून सुधारणा करण्यासाठी आदिवासी विकास मंत्री अशोक ऊईके यांच्या संकल्पनेतून ‘संवाद चिमुकल्यांशी’ अभियानाची सुरूवात 7 फेब्रुवारीपासून करण्यात आली आहे. या अभियानात राज्यभरातील शासकीय आदिवासी आश्रमशाळा आणि वसतीगृहांमध्ये विशेष पाहणी आणि संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
आमदार राजेश पाडवी विद्यार्थ्यांसोबत मुक्काम –
राज्य सरकारच्या “संवाद चिमुकल्यांशी” अभियानांतर्गत शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश दादा पाडवी यांनी देखील सहभाग घेतला. आमदार राजेश पाडवी यांनी मुलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अमोनी आश्रम शाळेत जाऊन विद्यार्थ्यांची संवाद साधत एक रात्र मुक्काम केला, यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला असून, विद्यार्थ्यांनी देखील त्यांच्या समस्या आमदारांना सांगितल्या.
यासोबतच आमदार पाडवी यांनी शिक्षणासंदर्भात माहिती घेतली आणि विद्यार्थ्यांच्या समस्या तात्काळ दूर करण्यासाठी सकारात्मक असून विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या जाणार –
रात्रभर मुक्काम केल्यानंतर सकाळी उठून विद्यार्थ्यांसोबत व्यायाम देखील केलं त्यामुळे विद्यार्थ्यांनी मन भरून आमदार राजेश पाडवी यांचे कौतुक केलं. दरम्यान, राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या संवाद चिमुकल्याची या कार्यक्रमामुळे खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या जाणार असून त्यांच्या भविष्यासाठी हा कार्यक्रम खरंच कौतुकास्पद आहे या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना अनेक चांगल्या गोष्टींच्या बोध घेता येणार असल्याचे आमदार राजेश पाडवी यांनी सांगितलं.
हेही पाहा : IPS Dr. Maheshwar Reddy: सोशल मीडिया, क्राइम, तरुणाई; Jalgaon SP डॉ. महेश्वर रेड्डींची विशेष मुलाखत






