• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ बंद होणार का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितली महत्त्वाची माहिती

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 8, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
Will mukhyamantri majhi ladki bahin yojana be closed? Important information given by Chief Minister Devendra Fadnavis

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ बंद होणार का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितली महत्त्वाची माहिती

मुंबई, 8 मार्च : महायुती सरकारकडून मागील वर्षी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची घोषणा करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात प्रति महिना 1500 रूपये जमा करण्यात येतात. ही योजना बंद होणार, अशा अनेक चर्चा होत असतात. या योजनेमध्ये अनेक महिलांची पडताळणी होत असल्याने विरोधकांकडून तसे आरोपही करण्यात आले. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महत्त्वाची माहिती दिली.

जागतिक महिला दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना शुभेच्छा देताना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ बंद होणार नसल्याचा पुनरुच्चार केला. लाडक्या बहिणींनी दिलेल्या भक्कम पाठिंब्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी कल्याणकारी राज्याची निर्मिती केली. महिलांच्या सशक्तीकरणासाठी महिलांचे कल्याण आणि विकास हेच राज्य शासनाचे सर्वोच्च प्राधान्य राहील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

जागतिक महिला दिन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिजन्माशताब्दी वर्षानिमित्त विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी प्रस्ताव मांडला. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी महिला सन्मान आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव केला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भारतीय संस्कृतीत माता आणि मातृभूमीला अधिक महत्त्व दिले आहे. संविधानाने महिलांना मतदानाचा अधिकार देऊन समानता दिली आहे. भारत हा मातृभावनेने भरलेला देश आहे. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर, जिजाऊमाता, राणी लक्ष्मीबाई, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांसारख्या स्त्रियांमुळे महाराष्ट्राचा इतिहास समृद्ध झाला. नद्यांना सुद्धा आपण मातेसमान मानतो ही भारतीय संस्कृतीची परंपरा आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी राज्यकारभारच नव्हे, तर सामाजिक सुधारणा, प्रशासन, न्यायव्यवस्था आणि लोककल्याणकारी योजना यावरही भर दिला. त्यांच्या कार्यपद्धतीत शाश्वत विकासाची तत्त्वे होती ती आजही मार्गदर्शक आहेत. असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी आपल्या काळात प्रभावी प्रशासन राबवले. त्यांनी आधुनिक पद्धतीचा स्वीकार करून उत्तम व्यवस्थापन केले. महेश्वरमध्ये अहिल्यादेवींनी आदर्श प्रशासन उभारून सुशासनाचा नवा अध्याय सुरू केला. त्यांनी जगभरातील कलाकारांना त्या ठिकाणी बोलावून राज्यातील कला आणि संस्कृतीला मोठा वाव दिला. त्यांनी स्थापत्यशास्त्राचा उपयोग करून अनेक शहरे वसवली आणि सुंदर मंदिरे, घाट, जलस्रोत विकसित केले. कलावंतांना प्रोत्साहन दिले. त्याच्यांकडे व्यवस्थापन कौशल्य आणि आधुनिक दृष्टिकोन होता.

अहिल्यादेवी होळकर यांनी श्रद्धास्थानाचा जीर्णोद्धार केला. भारतभर अनेक मंदिरे पुन्हा बांधली, जीर्णोद्धार केला अन्नछत्र आणि धर्मशाळां निर्माण केल्या. पर्यावरण संवर्धन आणि प्राणीमात्रांबद्दलच्या संवेदनशील होत्या. मानवतेसाठीच नव्हे, तर प्राणी आणि पर्यावरण संवर्धनासाठीही मोठे कार्य केले. प्रभावी जलसंधारण व्यवस्था निर्माण केली. त्यांनी पार, जलकुंड, विहिरी, तलाव आणि जलसाठ्यांची निर्मिती केली. राज्य शासनाने सुरू केलेली ‘जलयुक्त शिवार’ योजना देखील त्यांच्या जलसंवर्धन तत्त्वांवर आधारित आहे म्हणता येईल. असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

अहिल्यादेवी होळकर यांनी संपूर्ण भारतात एक आदर्श प्रशासनिक पद्धती निर्माण केली. न्यायदान करताना त्यांनी निष्पक्षपणे निर्णय घेतले आणि गरिबांना संरक्षण दिले. अहिल्यादेवी होळकर यांचे आयुष्य संवेदनशीलता, शौर्य, प्रशासनिक कौशल्य आणि समाजहिताच्या कार्याने समृद्ध होते. त्यांच्यात नम्रता आणि कणखरपणा यांचा योग्य समतोल होता. त्यांच्या काळात प्राण्यांच्या देखभालीसाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

भारतीय महिलांनी विविध क्षेत्रांत मोठी झेप घेतली आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांच्यासारख्या साहित्यिकांनी लोकपरंपरा जिवंत ठेवली. डॉ. प्रतिभाताई पाटील देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती ठरल्या. भारतीय नौदलात अनामिका राजीव यांना नेतृत्व मिळाल, सुमित्रा महाजन लोकसभेच्या अध्यक्षा झाल्या. असे सांगून महिलांबद्दलचा आदर, प्रतिष्ठा आणि समानता ही मूल्ये नवीन पिढीला शिकवली पाहिजेत. महिलांचा सन्मान आणि सशक्तीकरण हा आपल्या संस्कृतीचा पाया आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

अहिल्यादेवी होळकर या केवळ एक सशक्त प्रशासक नव्हत्या, तर त्या धर्मपरायण आणि समाजहितैषी होत्या. महिला सशक्तीकरणासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. या माध्यमातून त्यांना आर्थिक मदतीबरोबरच त्या उद्योजक बनतील याकडे विशेष लक्ष दिले जाईल, असे सांगून राज्यभरातील महिलांना त्यांनी महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा – सरकारकडून जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना गिफ्ट; फेब्रवारी आणि मार्च महिन्याचे पैसे एकत्र मिळणार

बातमी शेअर करा !
Share
Tags: devendra fadnavisladki bahin yojanaladki bahin yojana latest newsmukhyamantri ladki bahin yojanaमुख्यमंत्री लाडकी बहीण योजना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव विधानपरिषद: भाजपकडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी; इच्छुकांचा हिरमोड, शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष

जळगाव विधानपरिषद: भाजपकडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी; इच्छुकांचा हिरमोड, शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष

June 1, 2026
IPL 2026 Final: विराट कोहलीचे मॅचविनिंग अर्धशतक; गुजरातचा ५ गडी राखून पराभव करत आरसीबी सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन!

IPL 2026 Final: विराट कोहलीचे मॅचविनिंग अर्धशतक; गुजरातचा ५ गडी राखून पराभव करत आरसीबी सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन!

June 1, 2026
सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page