• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

नि:पक्ष, वस्तुनिष्ठ व पारदर्शी पत्रकारिता हा लोकशाहीचा गाभा – कुलगुरू प्रा.व्ही. एल माहेश्वरी

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात पत्रकार कार्यशाळा संपन्न

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 24, 2025
in जळगाव जिल्हा, खान्देश, जळगाव शहर, ताज्या बातम्या
नि:पक्ष, वस्तुनिष्ठ व पारदर्शी पत्रकारिता हा लोकशाहीचा गाभा – कुलगुरू प्रा.व्ही. एल माहेश्वरी

जळगाव, 24 मार्च : नि:पक्ष, वस्तुनिष्ठ व पारदर्शी पत्रकारिता हा लोकशाहीचा गाभा असून विकास पत्रकारितेद्वारा सरकारी योजना जनतेपर्यत पोहचविण्याचे काम पूर्वकाळापासून प्रसारमाध्यमांनी केले आहे, असे प्रतिपादन कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांनी केले.

“विकास पत्रकारिता : काल, आज, उद्या” कार्यशाळेचे आयोजन –
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील माध्यमशास्त्र प्रशाळा, विभागीय अधिस्वीकृती समिती, नाशिक व जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्र प्रशाळेत “विकास पत्रकारिता : काल, आज, उद्या” या विषयावर आयोजित चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी कुलगुरू प्रा.माहेश्वरी बोलत होते.

कार्यशाळेत व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर
कार्यशाळेत व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर

यावेळी मंचावर नाशिक येथील विभागीय माहिती उपसंचालक डॉ.किरण मोघे, अहिल्यानगर येथील विभागीय अधिस्विकृती समितीचे अध्यक्ष सुधीर लंके, जळगाव येथील जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ.सुनील पाटील, माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा.डॉ.सुधीर भटकर व जिल्हाधिकारी कार्यालयाचे मिलिंद बुवा हे उपस्थित होते.

प्रा.माहेश्वरी पुढे म्हणाले की, पूर्वीच्याकाळी लोकांपर्यंत माहिती पोहचविण्याचे काम वर्तमानपत्रे, रेडीओ, टीव्ही ही साधने करीत होती. आता तंत्रज्ञानात झालेला बदल व सोशल मिडीया या सारखी संसाधने वाढल्याने सरकारच्या योजना सर्वसाधारण जनतेपर्यंत सहज पोहचल्या जात आहेत. प्रसार माध्यमांद्वारे विकास पत्रकारितेचे काम चांगल्या पध्दतीने होत आहे. प्रारंभी प्रा.डॉ.सुधीर भटकर यांनी प्रास्ताविकात कार्यशाळेच्या आयोजना मागील भूमिका सांगितली. उद्घाटनसत्राचे सुत्रसंचालन डॉ.गोपी सोरडे यांनी केले तर आभार डॉ.सोमनाथ वडनेरे यांनी मानले.

उद्घाटनसत्रानंतर मिलिंद बुवा यांनी “प्रशासनात एआयचा वापर ” या विषयावर सविस्तर माहिती आपल्या व्याख्यानातून दिली. विभागीय उपसंचालक डॉ.किरण मोघे यांनी “पत्रकारांसाठीच्या विविध विकास योजना” या विषयावर माहिती दिली. अधिस्वीकृती पत्रिका-निकष आणि प्रक्रिया या संदर्भात विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष सुधीर लंके यांनी विवेचन केले. पुढील सत्रात जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी “शासकीय योजना आणि विकास पत्रकारिता” यावर भाष्य केले. त्यानंतर जनसंपर्क अधिकारी डॉ.सुनील पाटील यांनी “विकास पत्रकारितेतील स्थित्यंतर” या विषयावर विवेचन केले.

समारोप प्रसंगी प्रा.डॉ. सुधीर भटकर यांनी आभार मानले. यावेळी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ.सुनील पाटील हे 31मार्च रोजी सेवानिवृत्त होत असल्याने त्यांचा यावेळी कुलगुरू प्रा.माहेश्वरी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार शिवलाल बारी यांनी कुलगुरुंची तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सत्कार केला. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी ॲड.सूर्यकांत देशमुख, मंगेश बाविसाने, सौ.रंजना चौधरी, धनंजय देशमुख, भिकन बनसोडे यांनी परिश्रम घेतले.

हेही वाचा : कुणाल कामराच्या वादग्रस्त गाण्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील आक्रमक; म्हणाले, “माफी न मागितल्यास त्यांचं…”

बातमी शेअर करा !
Share
Tags: chancellor v l maheshwarijalgaon newsjournalism workshopkbcnmu jalgaonsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 11, 2026
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page