पुणे : जगातील सर्वात कठीण परिक्षांपैकी एक मानल्या जाणाऱ्या नागरी सेवा परिक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये पुण्याच्या अर्चित डोंगरे याने देशात तिसरा क्रमांक पटकावला.
UPSC ने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, अर्चित डोंगरेने व्हीआयटी, वेल्लोर येथून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीमध्ये बीटेक केले. यूपीएससीमध्ये त्याचा तत्त्वज्ञान होता. या विषयासह त्याने यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली. UPSC राज्यवार गुणवत्ता यादी जाहीर करत नसली तरी, अर्चित महाराष्ट्रातील सर्वोच्च क्रमांकाचा उमेदवार असल्याचे दिसते.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) आज मंगळवारी नागरी सेवा परीक्षा 2024 चा निकाल जाहीर केला आणि बीटेक पदवीधर असलेल्या पुण्याच्या अर्चित पराग डोंगरे याने देशात तिसरा क्रमांक पटकावला.
अर्चितने आपले शालेय शिक्षण मुंबईत पूर्ण केले आणि तो मूळचा पुण्याचा आहे. पुण्यात त्याने त्याचे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण घेतले. दरम्यान, एका आयटी फर्ममध्ये वर्षभर काम केल्यानंतर त्याने सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेच्या तयारीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी नोकरी सोडली. UPSC राज्यवार गुणवत्ता यादी जाहीर करत नसली तरी, अर्चित महाराष्ट्रातील सर्वोच्च क्रमांकाचा उमेदवार असल्याचे दिसते.
याआधी अर्चितने 2023 मध्ये UPSC नागरी सेवा परिक्षेत 153 वी रँक मिळवली होती. मात्र, यावेळी त्याने पुन्हा तयारी करत महाराष्ट्रात पहिला तसेच देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे.
UPSC 2024 मधील टॉप 10 उमेदवार –
शक्ति दुबे
हर्षिता गोयल
डोंगरे अर्चित पराग
शाह मार्गी चिराग
आकाश गर्ग
कोमल पुनिया
आयुषी बंसल
राजकृष्ण झा
आदित्य विक्रम अग्रवाल
मयंक त्रिपाठी
हेही वाचा – UPSC 2024 चा निकाल जाहीर, शक्ती दुबेने पटकावला देशात पहिला क्रमांक, टॉप 10 उमेदवारांची यादी