नवी दिल्ली : जगातील सर्वात कठीण परिक्षांपैकी एक मानल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षांचा (UPSC) निकाल जाहीर झाला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ने आज 22 एप्रिल रोजी UPSC नागरी सेवा अंतिम निकाल 2024 जाहीर केला आहे. या वर्षी शक्ती दुबे हिने UPSC सिव्हिल सर्व्हिसमध्ये देशात पहिला क्रमांक मिळवला.
भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय विदेश सेवा (IFS) आणि भारतीय पोलीस सेवा (IPS) आणि केंद्रीय सेवा, गट ‘A’ आणि गट ‘B’ मध्ये नियुक्तीसाठी एकूण 1,009 उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.
UPSC नागरी सेवा परीक्षा 2024 चा निकाल जाहीर झाला असून upsc.gov.in वर जाऊन हा निकाल तपासता येईल. या वर्षी शक्ती दुबे हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. UPSC ने एकूण 1009 निवडलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये सर्वसाधारण गटातील 335 उमेदवार आहेत. तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभागातील (EWS) 109 उमेदवार आणि OBC प्रवर्गातील 318 उमेदवार आहेत.
UPSC नागरी सेवा परीक्षा 2024 च्या मुलाखती 17 एप्रिलपर्यंत चालल्या. 7 जानेवारीपासून मुलाखतीची फेरी सुरू झाली. मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 2845 उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले.
नागरी सेवा परीक्षा 2024 अंतर्गत, केंद्रीय लोकसेवा आयोगाने IAS, IPS सह विविध सेवांमधील 1132 पदांसाठी अर्ज मागवले होते. यापूर्वी मूळ अधिसूचनेत 1056 जागा रिक्त होत्या. मात्र, नंतर रिक्त जागा वाढवण्यात आल्या.
UPSC 2024 मधील टॉप 10 उमेदवार –
-
- शक्ति दुबे
- हर्षिता गोयल
- डोंगरे अर्चित पराग
- शाह मार्गी चिराग
- आकाश गर्ग
- कोमल पुनिया
- आयुषी बंसल
- राजकृष्ण झा
- आदित्य विक्रम अग्रवाल
- मयंक त्रिपाठी