• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोऱ्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 31, 2023
in पाचोरा
पाचोऱ्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

पाचोरा (प्रतिनिधी), 31 मे : लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीच्या निमित्ताने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर धनगर समाज, पाचोरा यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पाचोर्‍याचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर चौक, जळगाव चौफुली येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

या कार्यक्रमात आयआयटी भुवनेश्वर येथून कम्प्युटर सायन्स या विषयांमध्ये एम टेक पूर्ण केलेल्या स्वप्निल मोरे, बीएसएफमध्ये निवड झालेल्या विजय हटकर, रांगोळी या कला प्रकारात उत्कृष्ट कार्य असलेले शैलेश कुलकर्णी, वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी डॉ. विठ्ठल पाटील यांना पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. धरणगावच्या कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब सुनील चौधरी यांनी समाजातील यशस्वी मुलींना पुस्तके देऊन सन्मानित केले.

यावेळी समाज बांधवांना उदबोधित करताना पाचोर्‍याचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी लोकमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकला. 28 वर्षे कुशल प्रशासन सांभाळणाऱ्या लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या न्यायप्रिय व शिस्तप्रिय कार्यकर्तृत्वाचा आदर्श संपूर्ण समाजासाठी कायमच प्रेरणादायी राहील, असे मत त्यांनी व्यक्त केले. प्रा. डॉ. अतुल सूर्यवंशी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. याप्रसंगी सायंकाळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक, जळगाव चौफुली येथून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकपर्यंत पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.

या कार्यक्रमासाठी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे जेष्ठ संचालक आप्पासाहेब सतीश चौधरी, नगरसेवक दादासाहेब भूषण वाघ, धरणगाव येथील कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब सुनील चौधरी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते किशोरभाऊ पेंढारकर, डॉ. सुनील हटकर, डॉ. मच्छिंद्र परदेशी, बापू हटकर, धोंडू हटकर, निवृत्ती हटकर, विशाल हटकर, जिभाऊ हटकर, भीमा हटकर, विजय हटकर, भटू हटकर, सुभाष हटकर, आखातवाड्याचे माजी सरपंच संजू परदेशी, जितू पेंढारकर, यश पेंढारकर, श्रीराम पाटील, सुनील निळे, नामदेव धनगर, सुनील रावते, दीपक चिंचोरे, धनराज सूर्यवंशी, सतीश देशमुख, विलास पाटील, स्वप्निल मोरे, डॉ विठ्ठल पाटील, प्रा डॉ अतुल सूर्यवंशी आदी समाज बांधव, माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Share
Tags: Ahilyadevi holkarpachorapachora news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page