मुंबई, 22 मे : राष्ट्रवादी पक्षाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणेने 16 मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. दरम्यान, हगवणे कुटुंबियांनी सूनेचा हुंड्यासाठी छळ केल्यामुळे वैष्णवीचा मृत्यू झाल्यानंतर राज्यात संताप व्यक्त केला जातोय. अशातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? –
मुंबईत माध्यमांसोबत संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वैष्णवीच्या मृत्यूचं प्रकरण ही माणुसकीला काळीमा फासणारी दुर्दैवी घटना आहे. या प्रकरणात आरोपींना अटक केली असून वैष्णवीचं बाळ आपल्याकडे ठेवण्याचा आरोपींचा प्रयत्न होता. मात्र, बाळ सुखरुप राहिलं पाहिजे त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला आहे. वैष्णवीचे बाळ हे तिच्या वडिलांकडे म्हणजेच आजोबांकडे पोहचले आहे.
View this post on Instagram
दरम्यान, वैष्णवीच्या मृतदेहावर जे वळ आढळून आले आहेत. यासोबतच ज्या काही ऑडिओ क्लिप समोर आल्या आहेत त्याच अनुषंगाने चौकशी केली जाईल. वैष्णवीच्या वडिलांचे जे म्हणणे आहे, त्यावर आधारितच चौकशी केली जाईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
View this post on Instagram
अजित पवारांचा कस्पटे कुटुंबासोबत फोनवरून संवाद –
कस्पटे कुटुंबियांसोबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोनवरून संवाद साधलाय. अजित पवार म्हणाले की, कधीच कोणी मला सांगितलं नाही की, मुलीला अशापद्धतीने त्रास होतोय. नाहीतर त्याचवेळी आपण लक्ष घातलं असत. माझा या प्रकरणाशी दुरान्वये संबंध नाहीये. मी पुर्णपणे तुमच्यासोबत असून मी पोलीस आयुक्तांसोबत बोललो असून याप्रकरणातील आरोपींना अटक करण्याचे सांगितले आहे. यामध्ये वैष्णवीचा सासरा फरार आहे त्यालाही लवकरच अटक करण्यात येईल. भेटीला येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. वैष्णवीचं बाळाला घरी पोहचवण्याचं देखील पोलिसांना सांगितलं. दरम्यान, उद्या किंवा परवा अजित पवार हे कस्पटे कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटीसाठी येणार असल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ठ केलंय.
नेमकं प्रकरण काय? –
पुण्यातील मुळशी तालुक्यातील भुकूम येथे १६ मे २०२५ रोजी वैष्णवी शशांक हगवणे या 23 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली. वैष्णवी ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून होती. दरम्यान, सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप तिच्या वडिल अनिल कस्पटे यांनी केलाय. लग्नाच्या वेळी 51 तोळे सोने तसेच एक फॉर्च्यूनर कार आणि इतर महागड्या वस्तू दिल्या होत्या. यानंतर वैष्णवीकडून आणखी पैशांची मागणी करण्यात आली. तसेच तिला घरातूनही बाहेर काढण्यात आले होते. दरम्यान वारंवार होणारा छळ सहन न झाल्याने तिने आत्महत्या केल्याचे कस्पटे यांनी म्हटलंय. यानंतर वैष्णवीच्या वडिलांनी केलेल्या आरोपानंतर राज्यात संताप व्यक्त केला जातोय.