• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home धुळे

‘विधिमंडळ आमदारांच्या समितीच्या सदस्यांना देण्यासाठी साडेपाच कोटींची रक्कम!’ अनिल गोटेंचा आरोप, धुळ्यात मध्यरात्री नेमकं काय घडलं?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 22, 2025
in धुळे, क्राईम, खान्देश, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
‘विधिमंडळ आमदारांच्या समितीच्या सदस्यांना देण्यासाठी साडेपाच कोटींची रक्कम!’ अनिल गोटेंचा आरोप, धुळ्यात मध्यरात्री नेमकं काय घडलं?

धुळे, 22 मे : विधिमंडळ अंदाज समितीचे सदस्य (आमदार) हे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याच्या अभ्यास दौऱ्यावर असताना मोठी बातमी समोर आली आहे. विधिमंडळाच्या आमदार समितीतील सदस्यांना धुळ्यातील शासकीय विश्रामगृहाच्या 102 क्रमांकाच्या खोलीत 5 कोटी रूपये ठेवले असल्याचा आरोप धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांना केला. दरम्यान, अनिल गोटेंच्या आरोपानंतर धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहामधील खोली क्रमांक 102 मध्ये एक कोटी 84 लाख 84 हजार रुपयांची रोकड आढळली. याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

धुळ्यात मध्यरात्री नेमकं काय घडलं? –
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल गोटे यांनी केलेल्या आरोपानंतर गुलमोहर शासकीय विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 ही यांचे खासगी स्वीय सहायक किशोर पाटील यांच्या नावाने बुक करण्यात आल्याने ती लॉक होती. असे असताना रात्री 11 वाजता प्रातांधिकारी रोहन कुवर, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता आर.आर.पाटील, शिवसेना उबाठाचे नरेंद्र परदेशी, कॅमेरामन माळी या पाच लोकांच्या कमिटीने खोलीचे कुलूप तोडले.

विश्रामगृहात कोट्यवधींचे रक्कम आढळली –
यामध्ये एक कोटी 84 लाख 84 हजार रुपयांची रोकड आढळली. या रोकड रक्कमेची मोजणी गुरुवारी पहाटे चार वाजता संपली आणि त्यानंतर पहाटे चार वाजता पोलिसांनी ती खोली सील केली. तसेच यावेळी तपासणी केली असता खोलीत नोटा सापडल्या आणि यामुळे नोटा मोजण्याचे मशीन मागवण्यात आले. या रोकड रक्कमेची मोजणी गुरुवारी पहाटे चार वाजता संपली आणि त्यानंतर पहाटे चार वाजता पोलिसांनी ती खोली सील करण्यात आली.

याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून विधिमंडळातील अंदाज समितीमधील आमदारांना देण्यासाठी रक्कम जमा केल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे.

अनिल गोटेंचा आरोप नेमका काय? –
धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी विधिमंडळ अंदाज समिती अभ्यास दौऱ्यावर आलेली आहे. आमदार अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार 21 मे रोजी समितीचे 29 पैकी 11 आमदार दाखल झाले आहेत. या समितीतील आमदारांना देण्यासाठी अधिकाऱ्यांनी साडे पाच कोटी रुपये गोळा केले असून ते विश्रामगृहाच्या 102 क्रमांकाच्या खोलीत ठेवले आहेत, असा आरोप गोटे यांनी केला. दरम्यान, या आरोपानंतर अनिल गोटे 102 क्रमांकाच्या खोली बाहेर ठाण मांडून बसले होते.

आमदार अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया –
आमदार अर्जुन खोतकर यांचे खासगी स्वीय सहायक किशोर पाटील यांच्या नावाने बुक करण्यात आलेल्या 102 क्रमांकाच्या खोलीत कोट्यवधी साडेपाच कोटी रूपयांची रक्कम ठेवल्याचा आरोप करण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना आमदार अर्जुन खोतकर म्हणाले की, माजी आमदार अनिल गोटे यांनी केलेले सर्व आरोप आम्ही फेटाळतो. खरंतर, सरकार आणि समितीला बदनाम करण्यासाठी ठरवून प्लॅन करण्यात आलेला आहे का असा आम्हाला संशय आहे.

अनिल गोटेंच्या आरोपांमध्ये कुठलेही तथ्य नसू आम्ही हे सर्व आरोप फेटाळतो. अनिल गोटेंची अशापद्धतीने आरोप करायची ही जुनी सवय आहे आणि त्यामाध्यमातून शासन आणि समितीला बदनाम करायचे ते काम करतात. दरम्यान, माझ्या स्वीय सहायकाच्या नावाने ती रूम नव्हती. याबाबत मी त्यांना विचारले असल्याचे अर्जुन खोतकर यांनी सांगितले.

हेही वाचा : “……तर कदाचित मी या पुरस्कारासाठी पात्र ठरले नसते!” संसदरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर खासदार स्मिता वाघ यांची विशेष मुलाखत

    बातमी शेअर करा !
    Share
    Tags: anil gotearjun khotkardhule newssuvarna khandesh live

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    ताज्या बातम्या

    अ‍ॅनिमिया निर्मूलनासह राज्यात प्रारंभिक बालविकास सेवांचा विस्तार आवश्यक – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

    अ‍ॅनिमिया निर्मूलनासह राज्यात प्रारंभिक बालविकास सेवांचा विस्तार आवश्यक – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

    August 31, 2026
    विकासासोबत पर्यावरण संवर्धनाची सांगड घालणे काळाची गरज : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    विकासासोबत पर्यावरण संवर्धनाची सांगड घालणे काळाची गरज : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    August 31, 2026
    माजी मंत्री आमदार एकनाथ खडसेंच्या अमृत महोत्सवात सर्वपक्षीय दिग्गजांची मांदियाळी; शरद पवारांकडून भाजप विस्तारातील योगदानाचे कौतुक

    माजी मंत्री आमदार एकनाथ खडसेंच्या अमृत महोत्सवात सर्वपक्षीय दिग्गजांची मांदियाळी; शरद पवारांकडून भाजप विस्तारातील योगदानाचे कौतुक

    August 30, 2026
    नेपाळमधून 143 भाविक मायभूमीत परतले; प्रशासनाच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे परतीचा प्रवास सुरक्षित, कुटुंबीयांना आनंदाश्रू

    नेपाळमधून 143 भाविक मायभूमीत परतले; प्रशासनाच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे परतीचा प्रवास सुरक्षित, कुटुंबीयांना आनंदाश्रू

    August 30, 2026
    ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

    ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

    August 29, 2026
    विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

    विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

    August 29, 2026
    • About
    • Contact Us
    • TERM AND CONDITIONS
    © 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

    Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

    No Result
    View All Result
    • Home
    • जळगाव जिल्हा
      • जळगाव शहर
      • पाचोरा
      • धरणगाव
      • एरंडोल
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • जामनेर
      • पारोळा
      • बोदवड
      • भडगाव
      • भुसावळ
      • यावल
      • रावेर
      • मुक्ताईनगर
    • महाराष्ट्र
    • खान्देश
      • धुळे
      • नंदुरबार
    • देश-विदेश
    • क्राईम
    • व्हिडीओ
    • साहित्य-परंपरा
    • मनोरंजन
    • करिअर
    • WEB STORIES

    Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

    Share

    You cannot copy content of this page