ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 27 जून : पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत 26 जून गुरूवार रोजी बारामती कॅटल फीड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे श्रीरामपूर येथील हिंदुस्थान फिडस यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे मोफत वितरण करण्यात आले. यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या.
हिंदुस्थान फिडसचे सेल्स ऑफिसर तुषार बाळासाहेब बाविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष गोकुळ परदेशी, शाळेचे शिक्षक केंद्रप्रमुख देविदास विसपुते, मुख्याध्यापक-जितेंद्र पाटील, शाळेतील शिक्षक तसेच सुवर्ण खान्देश लाईव्ह न्युजचे प्रतिनिधी ईसा तडवी आदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम हा पार पडला. यावेळी सुत्रसंचलन सुरेश कदम यांनी केले.
हिंदुस्थान फिडसचे सेल्स अधिकारी तुषार बाविस्कर यांनी सांगितले की, माझे ह्या शाळेत मोफत साहित्य वाटप करण्यात हे तिसरे वर्ष आहे. हिंदुस्थान फिडसचे ह्या कंपनीच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तसेच विविध माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना मदत करत असतात. या उपक्रमाचे जिल्हा परिषद मराठी शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांनी कौतुक केले.
यावेळी जिल्हा परिषद मराठी शाळेचे पदवीधर शिक्षक-समाधान गोलाईत, ज्ञानेश्वर भिसे, नंदकिशोर कदम, प्रशांत पाटील, श्रीराम वानखेडे, नितीन साळुंखे, हिम्मत पाटील, प्रशांत पाटील, तायडे मॅडम, निकम मॅडम, पूजा ठाकरे, सागर मॅडम, रमेश पाटील, महालपुरे सर आदी उपस्थित होते.
हेही वाचा : मराठी भाषा अनिवार्य; हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे