जळगाव, 30 जून : कृषी क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंती दिवस हा कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे कृषि विभाग, आत्मा व कृषी विभाग, जिल्हा परिषद, जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने हरीत क्रांतीचे जनक व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांची जयंतीनिमित्त उद्या 1 जुलै, 2023 रोजी सकाळी 11 वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पूज्य साने गुरुजी सभागृह, जिल्हा परिषद, जळगाव येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी सूरज जगताप (कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव) यांनी दिली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे आणि उद्घाटक म्हणून मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित राहतील. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अमन मित्तल हे असतील.
तसेच या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव पंकज आशिया, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या सोबतच कापुस पैदासकार, कापुस संशोधन केंद्र, जळगाव डॉ. गिरीष चौधरी, वरिष्ठ शास्त्रज्ञ किरण जाधव, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. हेमंत बाहेती हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास शेतकरी बांधव तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.