• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Video | शहीद जवान स्वप्नील सोनवणे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वीर जवान अमर रहेच्या घोषणा देत अखेरचा सलाम

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 12, 2025
in जळगाव जिल्हा, खान्देश, ताज्या बातम्या, भडगाव
Video | शहीद जवान स्वप्नील सोनवणे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वीर जवान अमर रहेच्या घोषणा देत अखेरचा सलाम

गुढे (भडगाव), 12 ऑगस्ट :  जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील गुढे गावातील बीएसएफ जवान स्वप्निल सुभाष सोनवणे यांना पश्मिच बंगालमध्ये सीमेवर कर्तव्यावर असताना वीरमरण आल्याची घटना 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली. दरम्यान, शहीद जवान स्वप्नील सोनवणे यांचे पार्थिव आज 12 ऑगस्ट रोजी पहाटे गुढे गावात दाखल झाले. यानंतर त्यांच्यावर आज सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वीर जवान अमर रहेच्या घोषणा देत शहीद जवानाला अखेरचा सलाम देण्यात आला.

गुढे गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार –

57 वाहिनी सीमा सुरक्षा दलातील कॉन्स्टेबल (जी.डी.) स्वप्निल सुभाष सोनवणे यांचा कर्तव्य बजावत असताना विजेच्या धक्क्याने झालेल्या मृत्यू नंतर आज मंगळवारी सकाळी त्यांच्या मूळ गावी गुढे (ता. भडगाव) येथे सैनिकी सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले. “वीर जवान अमर रहे” च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. गावातील नागरिक, नातेवाईक, मान्यवर व माजी सैनिकांनी अश्रूंच्या धारा वाहत आपल्या वीर पुत्राला अखेरचा निरोप दिला.

बीएसएफ जवान स्वप्निल सोनवणे यांना 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी बीओपी ढोलागुरी येथे सीमा फ्लड लाईट खांब दुरुस्त करताना विजेचा धक्का बसल्याने ते गंभीर जखमी झाले होते. तातडीने त्यांना बाळुरघाट जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)


सैनिकी सन्मानाने पार पडला अंतिम विधी –

आज सकाळी 10 वाजता पार्थिवावर पूर्ण सैनिकी सन्मानाने अंतिम विधी पार पडले. यावेळी तहसीलदार शितल सोलाट, पोलीस उपनिरीक्षक सुधीर सोनवणे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय गायकवाड, 57 बटालियन बीएसएफचे इन्स्पेक्टर कमल किशोर व सलामी पथक, माजी आमदार दिलीप वाघ, वैशाली सूर्यवंशी, सुमित पाटील, माजी सभापती विकास पाटील, शेतकी संघाचे चेअरमन भैय्यासाहेब पाटील, माजी जि.प. सदस्य संजय श्रावण पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख समाधान भाऊ पाटील, हर्षल पाटील, शिवदास पाटील, माजी सैनिक फेडरेशन भडगाव अध्यक्ष प्रमोद पाटील, उपाध्यक्ष, सचिव व माजी सैनिक बापू पाटील, गुढे गावच्या सरपंच कल्पना उत्तमराव महाजन, पोलीस पाटील मिलिंद मोहन मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

2014 साली बीएसएफमध्ये भरती –

वीर जवान स्वप्निल सोनवणे हे मूळचे भडगाव तालुक्यातील गुढे गावचे रहिवासी असून 2014 साली ते भारतीय सीमा सुरक्षा दलात भरती झाले होते. बीएसएफमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी पंजाब येथे प्रशिक्षण पुर्ण केले आणि आतापर्यंत त्यांनी गुजरात, राजस्थान, जम्मू-काश्मीर तसेच पश्चिम बंगाल याठिकाणी सेवा बजावली. दरम्यान, 11 वर्षांपासून देशसेवा करत असताना पश्चिम बंगालमध्ये कर्तव्यावर असताना त्यांना वीरमरण आले.

वीर जवान स्वप्निल सोनवणे यांच्या पश्चात आई, पत्नी तसेच एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. पाच वर्षांपुर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. दरम्यान, जवान सोनवणे यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली असून त्यांचे कर्तृत्व व शौर्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.

हेही वाचा : मोठी बातमी! सोलर फिटिंग करणाऱ्याकडे मागितली लाच अन् पाचोऱ्यात महावितरणचा सहायक अभियंता एसबीच्या जाळ्यात, नेमकं प्रकरण काय?

बातमी शेअर करा !
Share
Tags: bhadgaon taluka newsbsf jawan swapnil sonawanemarathi newsmartyred bsf jawansuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page