• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Maharashtra Bhavan in London : राज्य सरकारकडून लंडनमधील मराठीजनांना गणेशोत्सवानिमित्त मोठी भेट, महाराष्ट्र भवनासाठी 5 कोटींचा निधी मंजूर

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 27, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या, देश-विदेश
'Maharashtra Bhavan' to be built in London, fund of Rs 5 crore approved, information from Deputy Chief Minister Ajit Pawar

Maharashtra Bhavan in London : राज्य सरकारकडून लंडनमधील मराठीजनांना गणेशोत्सवानिमित्त मोठी भेट, महाराष्ट्र भवनासाठी 5 कोटींचा निधी मंजूर

मुंबई दि.२६ : लंडनमधील मराठीजनांना आपल्या हक्काचे आणि स्वतःच्या मालकीचे सांस्कृतिक भवन मिळावे, या अनेक वर्षांच्या मागणीला आता मूर्त स्वरूप मिळणार आहे. महाराष्ट्र मंडळ, लंडन या संस्थेला लंडनमधील ‘चर्च ऑफ इंग्लंड’ची इमारत खरेदी करुन तेथे ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. महाराष्ट्र शासनाने लंडनमधील मराठीजनांना गणेशोत्सवानिमित्त ही भेट दिल्याने तेथील महाराष्ट्र मंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

महाराष्ट्र मंडळ, लंडन ही भारताबाहेरील आणि युनायटेड किंगडममधील सर्वात जुन्या मराठी संस्थांपैकी एक आहे. १९३२ मध्ये महात्मा गांधींचे वैयक्तिक सचिव डॉ. एन. सी. केळकर यांनी या मंडळाची स्थापना केली. लंडन आणि आसपासच्या परिसरातील मराठी बांधवांना सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून एकत्र आणणे, हा या संस्थेचा मुख्य उद्देश होता. गेल्या ९३ वर्षांपासून हे मंडळ विविध सांस्कृतिक कार्यक्रम, उत्सव आणि सामाजिक उपक्रम राबवत आहे.

सध्या लंडन आणि परिसरातील सुमारे एक लाखाहून अधिक मराठी बांधव या मंडळाशी जोडले गेले आहेत. मात्र, स्थापनेपासूनच लंडनमधील महाराष्ट्र मंडळाची वास्तू भाडेतत्त्वावर होती. त्यामुळे मराठीजनांसाठी स्वतःच्या मालकीचे भवन असावे, अशी तेथील मराठीजनांची मागणी  होती.

गेल्या आठवड्यातच मंडळाच्या प्रतिनिधींनी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून आर्थिक सहकार्याची विनंती केली होती. या मागणीला उपमुख्यमंत्री पवार यांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला आणि प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेने राज्य शासनाने या संस्थेला ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यासाठी वापरला जाणार असून, यामुळे मराठीजनांना लंडनमध्ये स्वतःच्या मालकीचे सांस्कृतिक आणि सामाजिक केंद्र मिळणार आहे.

‘महाराष्ट्र भवन’ हे युनायटेड किंगडम आणि महाराष्ट्र शासन यांच्यातील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरेल, तसेच या भवनामुळे मराठी साहित्य, नृत्य, संगीत आणि सण-उत्सवांच्या माध्यमातून भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यात सांस्कृतिक आदान-प्रदानाला चालना मिळेल. मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी भाषा वर्ग, कार्यशाळा आणि आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन करता येईल. यामुळे मराठी भाषा जागतिक स्तरावर अधिक मजबूत होण्यास मदत होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केला आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: ajit pawarchurch of englandgovernment of maharashtralondonmaharashtra bhavan

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आमदार अमोल जावळे यांच्या माध्यमातून यावलमध्ये मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार अमोल जावळे यांच्या माध्यमातून यावलमध्ये मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

March 24, 2026
VIDEO | पेट्रोल पंपांवर पेट्रोल संपल्याबाबत अफवा; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांना केले महत्वाचे आवाहन

VIDEO | पेट्रोल पंपांवर पेट्रोल संपल्याबाबत अफवा; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांना केले महत्वाचे आवाहन

March 24, 2026
‘अन्न पदार्थामध्ये भेसळ कराल तर…..!’ अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा इशारा

‘अन्न पदार्थामध्ये भेसळ कराल तर…..!’ अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा इशारा

March 24, 2026
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करणार – मंत्री प्रकाश आबिटकर

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करणार – मंत्री प्रकाश आबिटकर

March 24, 2026
मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळे येथील गौण खनिज उत्खनन संदर्भात ईटीएस मोजणी – महसूल राज्यमंत्री योगेश कदम

मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळे येथील गौण खनिज उत्खनन संदर्भात ईटीएस मोजणी – महसूल राज्यमंत्री योगेश कदम

March 24, 2026
मतदारसंघातील जनतेची साथ कायम माझ्या पाठीशी; जनतेच्या विश्वासाच्या जोरावर ज्ञानार्जनाच्या कार्याला सुरुवात – आमदार किशोर आप्पा पाटील

मतदारसंघातील जनतेची साथ कायम माझ्या पाठीशी; जनतेच्या विश्वासाच्या जोरावर ज्ञानार्जनाच्या कार्याला सुरुवात – आमदार किशोर आप्पा पाटील

March 23, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page