चोपडा, 12 सप्टेंबर : चोपडा पंचायत समिती शिक्षण विभाग, चोपडा तालुका विज्ञान मंडळ व महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय, चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “मानव कल्याणासाठी विज्ञान व तंत्रज्ञान” या विषयांतर्गत पाच उपविषयांवर आधारित तालुकास्तरीय विज्ञान नाटयोत्सव स्पर्धा 11 सप्टेंबर रोजी संपन्न झाली. सदर स्पर्धा दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयाच्या अनुसयाबाई सभागृहात घेण्यात आली. या नाटयोत्सवात चोपडा तालुक्यातील एकूण 13 शाळांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे होत्या.
स्पर्धकांना “मानव कल्याणासाठी विज्ञान व तंत्रज्ञान” याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. परीक्षक म्हणून गौरव प्रकाश महाले (संचालक,शारदा मॅथ परिवार) तसेच जी. बी.पाटील (माध्य. शिक्षक, हातेड) यांनी कामकाज पाहिले. यावेळी मंचावर गटशिक्षणाधिकारी श्रीमती कविता सुर्वे, प्रशांत सोनवणे, मुख्याध्यापक एन. एस.सोनवणे, तालुका विज्ञान मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विजया पाटील, संजय सोनवणे (संचालक, माध्यमिक पतपेढी, जळगाव), सहसचिव निलेश पाटील, प्रसिद्धीप्रमुख रुपेश नेवे, सदस्य किशोर पाटील व एस. एम. चौधरी हे तालुक्यातील विज्ञान शिक्षक उपस्थित होते.
दरम्यान, या विज्ञान नाटयोत्सव स्पर्धेत प्रथम क्रमांक भाविका राजेंद्र पाटील व समूह (कस्तुरबा माध्यमिक विद्यालय, चोपडा) यांनी पटकावला व त्यांची निवड जिल्हास्तरावर झाली आहे. द्वितीय क्रमांक सुदिक्षण सतीश पाटील व समूह (पंकज माध्य. व उच्च माध्य. विद्यालय, चोपडा) तृतीय क्रमांक अनुज सुधीर पाटील व समूह (भाऊसो. शा शि. पाटील विद्यामंदिर, चहार्डी ) व उत्तेजनार्थ साक्षी बाळू कोळी व समूह (महात्मा गांधी विद्यालय,चोपडा) व नक्षत्र सागर धनगर व समूह (विवेकानंद विद्यालय,चोपडा) यांनी संयुक्तिकरित्या पटकावला.
कार्यक्रमाच्या शेवटी परीक्षक मनोगत गौरव महाले यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय सोनवणे, प्रास्ताविक संजय पाटील व आभार भूपेंद्र पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महात्मा गांधी विद्यालय विद्यालयाचे मुख्याध्यापक एन. एस. सोनवणे, संजय सोनवणे, दिनेश बाविस्कर , विज्ञान मंडळाचे प्रसिद्धी प्रमुख रुपेश नेवे, एस.एच. पाटील, श्रीमती एस. एस. बारेला,श्रीमती एच.डी. शहा, श्रीमती एस. एम. सुरवाडे, ए.आर. महाजन, श्रीमती नूतन चौधरी, श्रीमती के. ए. महाजन श्रीमती एस. एम. चौधरी, पी एस पाटील, पंकज पाटील व शिक्षण विभाग, चोपडा व विज्ञान मंडळाचे पदाधिकारी तसेच सर्व सहकारी शिक्षक व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.
हेही वाचा : नागरिकांनी आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घ्यावा