• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

“तुम्ही जे सांगितलं ते केलं, जे सांगाल ते करणार; पण….!”, पाचोऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जनतेला नेमकं आवाहन काय?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 27, 2025
in पाचोरा, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
“तुम्ही जे सांगितलं ते केलं, जे सांगाल ते करणार; पण….!”, पाचोऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जनतेला नेमकं आवाहन काय?

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

पाचोरा, 27 नोव्हेंबर : तुम्ही जे सांगितलं ते केलं, जे सांगाल ते करणार आणि ज्या योजना सुरू आहेत त्यादेखील सुरू ठेवण्याचं काम करणार आहे. पण, माझी एकच विनंती आहे की, धनुष्यबाणाला सर्वाधिक मतदान करा आणि पाचोऱ्यात नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुनिताताई पाटील तसेच नगरसेवकपदाचे सर्व उमेदवारांना बहुमताने निवडून देऊन शिवसेनेची सत्ता आणा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित जनतेला केले.

नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज संध्याकाळी 7 वाजता पाचोऱ्यात जाहीर सभा पडली. यावेळी ते बोलत होते. धनुष्यबाण ही आपली शान आणि अभिमान आहे. धनुष्याबाणाला मत म्हणजे विकासाला, किशोर आप्पांना तसेच लाडक्या बहिणींना मत होय, असेही यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

किशोर आप्पा खुदको अकेला नही समझना…दुश्मनो पे करेंगे मात; तुम्हारे पीछे खडा है एकनाथ, असे म्हणत आमदार किशोर आप्पा पाटील यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांचा विश्वास वाढवण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांनी केल्याचे आजच्या सभेतून दिसून आले. दरम्यान, गिरणा धरणावरून पाणी आणण्याचे काम येत्या काळात केले जाणार असून यामुळे पाचोऱ्याचा पाणी प्रश्न सुटणार असल्याचेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

“पाचोऱ्यात उद्योगधंदे आल्याशिवाय राहणार नाहीत!” –

पाचोऱ्यातील एमआयडीसीच्या माध्यामातून उद्योगधंदे आणण्यात यावेत, अशी मागणी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्याकडून करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत संवाद साधत तात्काळ याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पाचोऱ्यात एमआयडीसी मंजूर झालीय असून पुढील प्रक्रिया सुरू करण्यासाठी आताच मी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी बोललोय. यामुळे पुढील काळात पाचोऱ्यात उद्योगधंदे आल्याशिवाय राहणार नाहीत हा शब्द मी तुम्हाला देतो.

आमदार किशोर आप्पा हे माझे मानसपुत्र असून राज्याचा मुख्यमंत्री असताना आमदार किशोर आप्पा पाटील यांना मोठ्या प्रमाणात निधी देण्याचे काम केलंय आणि आताही नगरविकास खाते माझ्याकडे असून पाचोरा-भडगावसाठी जो काही निधी लागेल तो निधी देण्याचे काम पुढेही सुरू राहील, असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

‘लाडकी बहिण योजना बंद होणार नाही!’ –

सत्ता जनतेसाठी राबवयची असते आणि म्हणून जसे बाळासाहेब म्हणायचे की, कार्यकर्ता हा घरात नाही तर जनतेच्या दारात शोभून दिसतो. त्यापद्धतीने शासन आपल्या दारी हा कार्यक्रम राबविण्यात आला. जिल्हाधिकारी, तहसिलदार, बीडीओ असे सर्व कामाला लागले आणि कोट्यवधी जनतेला जागेवर लाभ घेता आला. दरम्यान, मुख्यमंत्री असताना शेतकरी, महिला, युवक, युवती तसेच जेष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना सुरू करून यशस्वीपणे राबविण्यात आल्याचेही उपमुख्यमंत्री एकथान शिंदे यांनी अधोरेखित केले. तसेच कोणीही आले तरी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही, असेही ते म्हणाले.

“…म्हणूनच मला किशोर आप्पांसारखे कार्यकर्ते आवडतात!”

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, मी किती प्रॉपर्टी कमवली; यापेक्षा मी किती माणसांचं प्रेम कमावलं हे महत्वाचं आहे. म्हणून शिवसेना हा पक्ष कोणी मालक किंवा नोकराचा नाही. हा पक्ष कार्यकर्त्यांचा असून कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा हा पक्ष आहे. आणि म्हणूनच मला किशोर आप्पांसारखे कार्यकर्ते आवडतात आणि मी त्यांच्यावर प्रेम करतो. तसेच त्यांच्या पाठीशी उभा राहतो.

मतदारसंघातील जनतेला मी केलेला विकास दिसतोय! – आमदार किशोर आप्पा पाटील

मागील काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विश्वासावर पाचोरा-भडगाव मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलवण्याचे काम केलं आहे. मात्र, विरोधकांनी हा विकास दिसत नसून मतदारसंघात कुठेही विकास केला नसल्याची टीका त्यांच्याकडून केली जातेय. ते म्हणतात की पाचोरा-भडगाव मतदारसंघ भकास आहे. पण, विरोधकांना मला काहीही बोलयचं नाही. कारण, मतदारसंघातील जनतेला मी केलेला विकास दिसतोय, हे माझं खऱ्या अर्थाने भाग्य असल्याचेही आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले.


आमदारांनी केली पाणीपुरवठा योजना मंजूर करण्याची मागणी –

पाचोऱ्यात पाण्याचा प्रश्न असून तो सोडविण्यासाठी गिरणा धरणावरून पाण्याची आवश्यकता आहे. यासाठी सविस्तरपणे डीपीआर तयार करण्यात आला आहे. यामुळे 370 करोड रूपयांची ही पाणीपुरवठा योजना मंजूर करून पाचोऱ्याचा पाणी प्रश्न सोडवावा, अशी मागणी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे यावेळी केले. दरम्यान, ही पाणीपुरवठा योजना मंजूर झाली तर भाजप नव्हे तर महाराष्ट्रातील कोणताही पक्ष आला ना तरी पाचोऱ्याची जनता ही माझी आणि शिवसेनेची साथ सोडल्याशिवाय राहणार नाही.
याप्रसंगी आमदार किशोर आप्पा पाटील, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुनिताताई पाटील, जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहील, शेतकरी सेनेचे प्रमुख सुनिल पाटील, माजी जि.प. सदस्य दिपकसिंग राजपूत, पद्मसिंह पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, संचालक सुनिल पाटील, विष्णू सोनार, शरद पाटे, प्रविण ब्राम्हणे, डॉ. प्रियंकाताई पाटील, जितेंद्र जैन, सुमित सावंत, युवानेते सुमित पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी घेतला निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा; प्रशासनाला केल्या महत्वाच्या सूचना

बातमी शेअर करा !
Share
Tags: dcm eknath shindemarathi newsmla kishor appa patilnagar parishad election 2025shivsenasuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page