• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्यास पोलिसांकडून अटक; 10 लाखांचा मुद्देमाल जप्त, नेमकी बातमी काय?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 5, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम, ताज्या बातम्या, मुक्ताईनगर
अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्यास पोलिसांकडून अटक; 10 लाखांचा मुद्देमाल जप्त, नेमकी बातमी काय?

जळगाव, 5 जानेवारी : जळगाव जिल्ह्यात अवैध गुटखा वाहतूक व विक्रीविरोधात स्थानिक गुन्हे शाखा व मुक्ताईनगर पोलीस स्टेशनच्या पथकाने कारवाई करत एकास अटक केली असून सुमारे 10 लाख 19 हजार 20 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अरबाज नौशाद बेग (वय 30, रा. काझी हाऊस, खुलताबाद, जि. छत्रपती संभाजीनगर) असे अटक केलेल्या वाहनचालकाचे नाव आहे.

नेमकी बातमी काय? –

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार, जळगाव जिल्ह्यात अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेला देण्यात आले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी एर्टिगा (क्रमांक MH-46-81065) या वाहनातून मुक्ताईनगर मार्गे बऱ्हाणपूर (म.प्र.) ते छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने अवैध गुटख्याची वाहतूक होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखा व मुक्ताईनगर पोलीस स्टेशनच्या पथकाने पुरनाड फाटा येथे सापळा रचला. संशयित वाहन भरधाव वेगात येताना दिसताच पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र चालकाने वाहन खामखेडा गावाच्या दिशेने पळवले. अखेर, पाठलाग करून पोलिसांनी वाहन अडवले.

10 लाखांचा मुद्देमाल जप्त –

वाहन चालकाचे नाव अरबाज नौशाद बेग (वय 30, रा. काझी हाऊस, खुलताबाद, जि. छत्रपती संभाजीनगर) असे असून त्याच्या ताब्यातून रजनीगंधा सुगंधित पान मसाला, करमचंद प्रीमियम पान मसाला, मिराज तंबाखू, विमल पान मसाला, पान पराग, जाफराणी जर्दा यांसह वाहन व मोबाईल फोन असा एकूण 10,19,020 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष ढवळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड व पोलीस निरीक्षक आशिष आडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी, तसेच दोन्ही नेम- मुक्ताईनगर पो.स्टे, पोह. विजय पाटील, श्रीकृष्ण पाटील, प्रेमचंद सपकाळे, विनोद पाटील, रविंद्र चौधरी, सलिम तडवी, छगन तायडे, रतनहरी गिते, हेंमत पाटील, सर्व नेमणुक-स्थानिक गुन्हे शाखा, जळागंव व पो.अं. गोविंद सुरवाडे, गोविंद पवार सहभागी होते.

हेही वाचा : मराठी ही केवळ संवादाची नव्हे, तर रोजगाराची भाषा व्हावी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बातमी शेअर करा !
Share
Tags: illegally transporting gutkhajalgaon crime newsjalgaon newsjalgaon policelocal crime branchmarathi newsmuktainagar police station

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page