• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home खान्देश

जळगाव महापालिकेच्या महापौरपदी दीपमाला काळे, उपमहापौरपदी मनोज सुरेश चौधरी यांची निवड

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 6, 2026
in खान्देश, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
जळगाव महापालिकेच्या महापौरपदी दीपमाला काळे, उपमहापौरपदी मनोज सुरेश चौधरी यांची निवड

जळगाव, 6 फेब्रुवारी : जळगाव महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठीची निवड प्रक्रिया आज, गुरुवार दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विशेष सभेत पार पडली. या विशेष सभेत जळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी दीपमाला मनोज काळे यांची तर उपमहापौर पदासाठी मनोज सुरेश चौधरी यांची निवड करण्यात आली.

पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली महापौर व उपमहापौर पदाच्या निवडीसाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे तसेच महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांचे अभिनंदन करून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

दीपमाला काळे जळगावच्या 17 व्या महापौर –

महापालिका निवडणुकीत निर्विवाद बहुमत मिळवलेल्या महायुतीने परस्पर समन्वय राखत महापौर व उपमहापौर पदांसाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे शुक्रवारी दोन्ही पदांची निवड बिनविरोध पार पडली. यामध्ये भाजपच्या दीपमाला काळे यांची जळगावच्या 17 व्या महापौर म्हणून निवड होऊन त्यांना हा मान मिळाला.

महापौर-उपमहापौर पदासाठी बिनविरोध निवड –

जळगाव महापालिकेत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा जिंकत स्पष्ट आघाडी मिळवली आहे. त्यामुळे महापौरपद भाजपकडे तर उपमहापौरपद शिवसेना शिंदे गटाकडे जाणार, हे सुरुवातीपासूनच जवळपास निश्चित मानले जात होते. या राजकीय समीकरणानुसार महापौरपदासाठी भाजपकडून दीपमाला काळे, तर उपमहापौरपदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून मनोज चौधरी यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते.

दोन्ही पदांसाठी अन्य कोणताही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने दीपमाला काळे आणि मनोज चौधरी यांची निवड बिनविरोध होणार हे स्पष्ट झाले होते. दरम्यान, आज 6 फेब्रुवारी रोजी महापौर व उपमहापौर पदासाठीची निवड प्रक्रियेत त्यांच्या बिनविरोध निवडीवर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले.

जळगाव महानगरपालिका निवडणूक निकाल 2026 –

जळगाव महानगरपालिकेत भाजपने, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन्ही पक्षांनी महायुती म्हणून निवडणूक लढवली. यामध्ये महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला. भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक 46 जांगा जिंकल्या आहेत. तर शिंदेंच्या शिवसेनेने 22 आणि अजित दादांची राष्ट्रवादीने 6 पैकी 1 जागेवर विजय मिळवलाय. यामध्ये भाजप नंबर एकचा पक्ष ठरला असून जळगावात भाजपने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केलं. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे 5 उमेदवार निवडून आले आहेत. तर एका अपक्ष उमेदवाराने देखील विजय मिळवलाय.

हेही वाचा : अजित पवारांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; कार्यकर्त्यांसाठी केलं महत्वाचं आवाहन

बातमी शेअर करा !
Share
Tags: deepmala kaleJalgaon Municipal Corporationjalgaon newsmanoj suresh chaudharymayorsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page