• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

धक्कादायक! पद्मालय शिवारातील ‘त्या’ जळालेल्या मृतदेहाच्या खुनाचा उलगडा; तृतीयपंथी महिलेची हत्या झाल्याचे उघड, आरोपी अटकेत

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 6, 2026
in जळगाव जिल्हा, एरंडोल, क्राईम, ताज्या बातम्या
धक्कादायक! पद्मालय शिवारातील ‘त्या’ जळालेल्या मृतदेहाच्या खुनाचा उलगडा; तृतीयपंथी महिलेची हत्या झाल्याचे उघड, आरोपी अटकेत

जळगाव, 6 फेब्रुवारी: जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील पद्मालय शिवाराच्या हद्दीत एका महिलेचा अर्धवट जळलेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. सदर महिला ही तृतीयपंथी असून प्रेमसंबंधातून झालेल्या वादातून रागाच्या भरात तिची हत्या करण्यात आल्याचे पोलिस तपासातून उघड झाले आहे. विशेष म्हणजे जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या 48 तासांत या खुनाचा उलगडा करत आरोपीस अटक केली आहे. गोलू उर्फ स्वप्नील अशोक पाटील (रा. पहूर, ता. जामनेर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

नेमकी घटना काय? –

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पद्मालय वनपरिक्षेत्रात 4 फेब्रुवारी दुपारी १२:०० वाजेच्या सुमारास एका महिलेचा व्यक्तीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची ओळख मिटवण्यासाठी आरोपीने चेहरा आणि छातीचा भाग ज्वलनशील पदार्थ टाकून पूर्णपणे जाळला होता. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुरनं. १६/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १०३ (१) आणि २३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मृतदेहाची ओळख पटवणे पोलिसांसमोर होते मोठे आव्हान –

जळगाव जिल्हयातील एरंडोल पोलीस ठाण्याच्या हद्दीत पद्मालय ते नागदुली रस्त्यावरील जंगलात एका अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह विद्रूप अवस्थेत असल्याने ओळख पटवणे हे मोठे आव्हान होते. तसेच डोगराळ परिसर व घनदाट जंगल असल्याने मानवी वरदळ नसल्याने सदरचा मृतदेह हा कोणाच्या निदर्शनास येणार नाही अशा परिस्थती निर्जन स्थळी पडलेल्या अवस्थेत होता.

पोलिसांनी अवघ्या 48 तासांत गुन्ह्याचा छडा लावला –

सदर घटनेचे गांभीर्य ओळखून जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा जळगावचे अधिकारी व अंमलदार यांचे 4 पथके तयार करुन यांनी अत्यंत कौशल्याने तपास करून केवळ 48 तासांत या गुन्ह्याचा छडा लावला असून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

….अन् पोलिसांनी घेतले आरोपीस ताब्यात –

मृतदेहाच्या पायाच्या नखांवरील मॅजंटा रंगाचे नेलपॉलिश आणि डाव्या नाकपुडीतील सोन्याची मुर्नी हे ओळख पटविण्याचे महत्त्वाचे धागे ठरले. फॉरेन्सिक तज्ञांनी मृतदेहावरील अळ्यांच्या (मॅगॉट्स) वाढीचा अभ्यास करून मृत्यूचा कालावधी ३० किंवा ३१ जानेवारी (शुक्रवार/शनिवार) असल्याचे निश्चित केले. मिळालेल्या गोपनीय माहितीसह घटनास्थळावरील भौतिक, वस्तूजन्य व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी गोलू उर्फ स्वप्नील अशोक पाटील (रा. पहूर, ता. जामनेर) यास ताब्यात घेतले असून, सखोल चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

आरोपीने पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला –

मयत आकाक्षा उर्फ अजय हेमराज गेड्रे (रा. सोनसरार खैरागड जि. राजनाथगांव राज्य-छत्तीसगड) हिच्याशी असलेल्या प्रेमसबंधाच्या वैयक्तिक वादातून आणि रागाच्या भरात डोक्यात प्रहार करून तसेच ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून हत्या करण्यात आली. त्यानंतर आरोपीने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहावरील कपडे काढून मोटार सायकल मधील पेट्रोल काढून ते मृतदेहावर टाकून जागीच जाळण्याचा प्रयत्न केला होता. त्यातून तिचा अर्धवट मृतदेह जळाला होता. अशी कबुली आरोपी गोलू उर्फ स्वप्नील अशोक पाटीलने दिली आहे.

जळगाव पोलिसांची धाडसी कामगिरी –

सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उप निरीक्षक सोपान गोरे, शरद बागल, जितेंद्र वल्टे, पोलीस अंमलदार ईश्वर पाटील, पहूर पो.स्टे. कडिल पोलीस अंमलदार विनोद सुभाष पाटील तसेच स्थानिक गुन्हा शाखा, जळगाव कडिल सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार जळगाव पोलीस दलाच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हेही वाचा : Video | ‘अजित पवार यांच्या विमानात बॉम्ब होता का?’ विमान अपघाताबाबत खासदार बजरंग सोनवणे यांना शंका, नेमकं काय म्हणाले?

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon crimejalgaon lcbjalgaon newsmarathi newsmurder newssuvarna khandesh livetransgender woman

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जनसहभागातून जळगावच्या सर्वांगीण विकासाला गती; लोककल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यावर भर

जनसहभागातून जळगावच्या सर्वांगीण विकासाला गती; लोककल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यावर भर

August 15, 2026
बामनी नदीवरील पुलासाठी आमदार किशोर आप्पा पाटील यांना निवेदन; सातगाव-गहुले परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर करण्याची मागणी

बामनी नदीवरील पुलासाठी आमदार किशोर आप्पा पाटील यांना निवेदन; सातगाव-गहुले परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर करण्याची मागणी

August 15, 2026
महाराष्ट्रातील 3 लाख तरुणींना रोजगार संधींसाठी राज्यस्तरीय अभियान राबविण्यात येणार

महाराष्ट्रातील 3 लाख तरुणींना रोजगार संधींसाठी राज्यस्तरीय अभियान राबविण्यात येणार

August 15, 2026
तारखेडा बु. येथील बंद शेतरस्ता तातडीने सुरू करा; शेतकऱ्यांचे आमदार किशोर आप्पा पाटील यांना निवेदन

तारखेडा बु. येथील बंद शेतरस्ता तातडीने सुरू करा; शेतकऱ्यांचे आमदार किशोर आप्पा पाटील यांना निवेदन

August 15, 2026
पाचोरा येथे दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी शिबिर सुरू करण्याची मागणी; आमदार किशोर आप्पा पाटील यांना दिव्यांग बांधवांचे निवदेन

पाचोरा येथे दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी शिबिर सुरू करण्याची मागणी; आमदार किशोर आप्पा पाटील यांना दिव्यांग बांधवांचे निवदेन

August 14, 2026
पाचोरा तालुक्यातील शेवाळे येथे जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा

पाचोरा तालुक्यातील शेवाळे येथे जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा

August 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page