• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ? भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 7, 2026
in महाराष्ट्र, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ? भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी

मुंबई, 7 फेब्रुवारी : पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन गैरव्यवहार प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली मुंबईतील विशेष न्यायालयाने राज्याचे माजी मंत्री एकनाथ खडसे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. वारंवार न्यायालयात गैरहजर राहिल्याने न्यायालयाने ही कठोर कारवाई केली आहे.

नेमकी बातमी काय? –

पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन गैरव्यवहार प्रकरणात शुक्रवारी 6 फेब्रुवारी रोजी दोषारोप निश्चिती (चार्ज फ्रेमिंग) संदर्भात विशेष न्यायालयात सुनावणी झाली. या टप्प्यावर सर्व आरोपींची प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक असते. मात्र, एकनाथ खडसे आणि मंदाकिनी खडसे हे दोघेही न्यायालयात हजर राहिले नाहीत. त्यांच्या वतीने हजेरीतून सूट मिळावी यासाठी अर्ज सादर करण्यात आला होता.

मात्र, खासदार आणि आमदारांसाठीच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश महेश जाधव यांनी हा अर्ज फेटाळून लावला. अर्जात गैरहजेरीमागे कोणतेही ठोस अथवा वैयक्तिक कारण नमूद करण्यात आले नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. आरोपींनी न्यायालयीन प्रक्रियेत सहकार्य करणे अपेक्षित असून, अस्पष्ट कारणांमुळे सुनावणीला विलंब लावता येणार नाही, असे न्यायालयाने नमूद केले.

खडसे दाम्पत्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी –

एकनाथ खडसे आणि मंदाकिनी खडसे न्यायालयात उपस्थित न राहिल्यामुळे विशेष एमपी-एमएलए न्यायालयाने त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. या प्रकरणात खडसे यांचा दोषमुक्तीचा अर्ज डिसेंबर महिन्यात याच विशेष न्यायालयाने फेटाळून लावला होता. तसेच, या कारवाईला अंतरिम स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयानेही नकार दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 13 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

भोसरी एमआयडीसी जमीन गैरव्यवहार प्रकरण –
भोसरी एमआयडीसी जमीन गैरव्यवहार प्रकरणात एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी एमआयडीसीच्या मालकीची सरकारी जमीन नियमबाह्य पद्धतीने खरेदी केल्याचा आरोप आहे. 2016 मध्ये खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांनी भोसरी येथील सर्व्हे क्रमांक 52/2 अ ही जमीन मूळ मालकाकडून 3.75 कोटी रुपयांना खरेदी केली होती. मात्र, ही जमीन एमआयडीसीच्या ताब्यात असतानाही सरकारी कागदपत्रांत खडसे कुटुंबीय मालक बनले.

या व्यवहारासाठी पाच शेल कंपन्यांकडून आलेल्या पैशांचा वापर झाल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, त्यामुळे राज्य सरकारचे सुमारे 61 कोटी रुपयांचे महसुली नुकसान झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) गिरीश चौधरी यांना अटक केली असून, एकनाथ खडसे यांचीही चौकशी करण्यात आली आहे.

हेही वाचा : हरारेत U-19 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाची दमदार कामगिरी, इंग्लंडवर मात करत भारत सहाव्यांदा विश्वविजेता

बातमी शेअर करा !
Share
Tags: bhosari midc land scam caseeknath khadsemarathi newsnon bailable warrantsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

June 17, 2026
पाचोऱ्यात दिवसाढवळ्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

पाचोऱ्यात दिवसाढवळ्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

June 17, 2026
महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण 2026 जाहीर; पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजना

महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण 2026 जाहीर; पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजना

June 17, 2026
‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ मोहिमेत प्रत्येक नागरिकाने राज्य शासनासोबत एकत्र येऊन काम करणे गरजेचे – मंत्री संजय राठोड

‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ मोहिमेत प्रत्येक नागरिकाने राज्य शासनासोबत एकत्र येऊन काम करणे गरजेचे – मंत्री संजय राठोड

June 15, 2026
राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

June 13, 2026
‘महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख’; पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक

‘महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख’; पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक

June 13, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page