• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

खेलो इंडिया मल्टिपर्पज हॉल महाराष्ट्राच्या ऑलिम्पिक तयारीसाठी महत्त्वाचा टप्पा- केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) च्या ‘खेलो इंडिया मल्टिपर्पज हॉल’चे भूमिपूजन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 9, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
खेलो इंडिया मल्टिपर्पज हॉल महाराष्ट्राच्या ऑलिम्पिक तयारीसाठी महत्त्वाचा टप्पा- केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

छत्रपती संभाजीनगर, 9 फेब्रुवारी : महाराष्ट्रातील खेळाडूंच्या ऑलिम्पिक तयारीला बळकटी देणारा ‘खेलो इंडिया मल्टिपर्पज हॉल’ हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असल्याचे प्रतिपादन केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केले.

स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) च्या नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स येथे प्रस्तावित ‘खेलो इंडिया मल्टिपर्पज हॉल’च्या भूमिपूजन समारंभाला त्या उपस्थित होत्या. यावेळी आयसीआयसीआय फाउंडेशनच्या सीएसआर उपक्रमांतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या उच्च दर्जाच्या क्रीडा विज्ञान उपकरणांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले. या यावेळी आयसीआयसीआय बँकेचे झोनल हेड अभिजीत सिंग पवार, मासिया (MASSIA) अध्यक्ष अर्जुन गायकवाड, स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या उपसंचालक डॉ. मोनिका घुगे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे म्हणाल्या की, ‘खेलो इंडिया’ अभियानाच्या माध्यमातून तळागाळातील खेळाडूंच्या प्रतिभा विकासासोबतच जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत. सीएसआर भागीदारीमुळे आधुनिक प्रशिक्षण, वैज्ञानिक सुविधा व उच्च कार्यक्षमतेची साधने उपलब्ध होत असून, त्यामुळे खेळाडूंच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठीच्या तयारीला मोठी चालना मिळत आहे.

स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया आणि आयसीआयसीआय फाउंडेशन यांच्यातील सहकार्यामुळे शासकीय योजना व कॉर्पोरेट सहभाग यांचा प्रभावी समन्वय साधला जात असल्याचे स्पष्ट होत आहे. या भागीदारीमुळे उच्च कार्यक्षमतेच्या प्रशिक्षण कार्यक्रमांना बळ मिळून मराठवाड्यातील युवा खेळाडूंना अधिक संधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.‘खेलो इंडिया’ अभियानांतर्गत पायाभूत सुविधा विकास, प्रतिभा शोध, तसेच वैज्ञानिक प्रशिक्षण प्रणालीवर विशेष भर देण्यात येत असून, भारताला जागतिक क्रीडा क्षेत्रात आघाडीवर नेण्याच्या दिशेने हे अभियान महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे., असेही राज्यमंत्री रक्षा खडसे म्हणाल्या.

यावेळी स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या उपसंचालक डॉ. मोनिका घुगे यांनी साई सेंटरच्या माध्यमातून विविध क्रिडा स्पर्धेतील यशाबाबत, मल्टीपर्पज हॉलबाबत माहिती दिली. आयसीआयसीआय बँकेचे झोनल हेड अभिजीत सिंग पवार यांनी क्रीडा क्षेत्रातील प्रगतीसाठी आपला सहभाग कायम असेल, असे सांगून आपल्या क्रीडा क्षेत्रातील आपल्या सहभाबाबत माहिती दिली. यावेळी विविध क्रीडा स्पर्धेत पदक मिळविलेल्या खेळाडूंचा राज्यमंत्री खडसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी क्रीडा क्षेत्रातील प्रशिक्षक, खेळाडू उपस्थित होते.

हेही वाचा: लाडकी बहिण योजनेसंदर्भात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रशासनाला महत्वाचे आदेश

बातमी शेअर करा !
Share
Tags: marathi newsmos raksha khadsemultipurpose hall bhumi pujansambhajinagarsports authority of indiasuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“घरकुलाच्या कामात दुर्लक्ष केल्यास तर थेट…!” पाचोरा तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना CEO करिश्मा नायर यांचा अल्टिमेटम

“घरकुलाच्या कामात दुर्लक्ष केल्यास तर थेट…!” पाचोरा तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना CEO करिश्मा नायर यांचा अल्टिमेटम

July 8, 2026
अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी नवीन नियमावली लवकरच; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत माहिती

अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी नवीन नियमावली लवकरच; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत माहिती

July 8, 2026
VIDEO | राज्यातील 138 जलदगती न्यायालयांसाठी न्यायाधीशांच्या उपलब्धतेसाठी उच्च न्यायालयाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

VIDEO | राज्यातील 138 जलदगती न्यायालयांसाठी न्यायाधीशांच्या उपलब्धतेसाठी उच्च न्यायालयाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 8, 2026
VIDEO | ‘रील्स’च्या नावाखाली स्टंटबाजी करणाऱ्यांवर जळगाव पोलिसांची कारवाई; मुख्यालयात बोलावून दिला कायद्याचा धडा

VIDEO | ‘रील्स’च्या नावाखाली स्टंटबाजी करणाऱ्यांवर जळगाव पोलिसांची कारवाई; मुख्यालयात बोलावून दिला कायद्याचा धडा

July 8, 2026
VIDEO | वीस वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न सुटला, नर्मदेतून महाराष्ट्राला 10 टीएमसी पाणी, उत्तर महाराष्ट्राला जिल्ह्यांना फायदा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

VIDEO | वीस वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न सुटला, नर्मदेतून महाराष्ट्राला 10 टीएमसी पाणी, उत्तर महाराष्ट्राला जिल्ह्यांना फायदा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 8, 2026
जळगाव जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न; चार वर्षे सलग 100 टक्के निधी खर्चाची परंपरा कायम, बैठकीतील महत्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर

जळगाव जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न; चार वर्षे सलग 100 टक्के निधी खर्चाची परंपरा कायम, बैठकीतील महत्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर

July 7, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page