पाचोरा, 13 मार्च: पाचोरा तालुक्यातील डोंगरगाव येथे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र व पत्रकार संघ गजानन लाधे यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. 8 मार्च जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण विश्वामध्ये महिलांना सन्मान दिला जातो. यामुळे महिलांमधील आत्मविश्वास वाढावा व त्यांच्या मनातील भाय भिती कमी व्हावी पुरुषांच्या बरोबरीला महिलांचे कर्तृत्व महान आहे. असं सांगणारा हा जागतिक महिला दिन आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा या होत्या तर प्रमुख उपस्थितीमध्ये सामाजिक कार्यकर्त्या श्वेता सीमा विनोद पाटील होत्या.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने जवळपास 18 कर्तुत्ववान महिलांना रणरागिणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील सर्व पत्रकार बंधू स्वामी समर्थ सेवेकरी व डोंगरगाव मधील ग्रामस्थ व माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिलांनी घाबरून न जाता अन्याय विरुद्ध लढा देणे हे प्रत्येक महिलेचा कर्तव्य आहे असा संदेश सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांनी दिला तर स्त्री-पुरुषसमान आहे. मुलींनी शिकावं व आपल्या पायावरती उभे राहावं असा संदेश श्वेता सीमा विनोद पाटील यांनी दिला. तर महिलांना सक्षम व आत्मनिर्भर बनायचं असेल तर श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात प्रशिक्षण दिले जाते, अशी माहिती संदीप पाटील यांनी दिली.
ह.भ.प. कीर्तनकार सुनीताताई पाटील (लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था, पाचोरा – संचालिका), दीपालीताई मुकेश मापारे (बालसंस्कार प्रतिनिधी, डोंगरगाव), स्वातीताई श्रीकांत पांडे (शेवाळे), गंगाबाई महारु चव्हाण (वडगाव जोगे), उषाताई बाळू इजारे (गृहिणी, डोंगरगाव), सुनिता भगवान पाटील (पोलीस पाटील, पिंपरी खुर्द), सखुबाई बाबुलाल तडवी (आदर्श महिला, सातगाव डोंगरी), गायत्री श्री कृष्णा सिरसागर (न्यूज चॅनल अँकर, पिंपळगाव हरेश्वर), मिराबाई सुनील इजारे (अंगणवाडी सेविका, डोंगरगाव), लताताई बापूराव पाटील, वाडी शेवाळे (केंद्र प्रमुख, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र), श्रद्धाताई दत्तू पाटील (अंगणवाडी सेविका, पिंपरी खुर्द) ज्योतीताई यशवंत दुसाने अध्यात्मिक प्रवचन कार, प्रतिनिधी चंद्रकांला कृष्णाराव पाटील, पर्यवेक्षिका शिंदाड, कार्यक्रमासाठी उपस्थित होते. डोंगरगाव येथील माजी सरपंच गजानन कळवत्रे यांच्याकडून महिलांमध्ये प्रश्न उत्तर कार्यक्रम घेण्यात आला .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कडे वडगाव येथील संदीप पाटील यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली व कार्यक्रमानंतर स्नेनभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.






