लोहगाव (पुणे), 9 ऑगस्ट: पुणे जिल्ह्यातील लोहगाव येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी समाजाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा आणि अस्मिता जपत हा दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाला भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव अविनाश अशोक मुंढे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी उपस्थित आदिवासी समाजबांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी समाजाने एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमादरम्यान आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा, सामाजिक हक्क तसेच शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक विकासाच्या विविध मुद्द्यांवर विचारमंथन करण्यात आले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याची भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी आदिवासी आघाडी मोर्चा, पुणे जिल्हा उत्तर भाजपाचे सरचिटणीस विशाल बांबळे, डगळे साहेब, गोतारणे साहेब तसेच अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रावसाहेब राखपसरे यांची उपस्थिती होती.
तसेच आदिवासी समाजसेवक सुनील मांडवे, सुनील मुंढे घुटे, तुकाराम मुंढे, अमोल मुंढे, राहुल मुंढे, बाळासाहेब म्हस्कर, चंद्रकांत मुंढे यांच्यासह आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा आणि अस्मिता जपत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संघटितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. विविध उपक्रम आणि समाजबांधवांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.






