• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

गॅस सिलेंडर व पेट्रोल-डिझेल साठा मुबलक; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 27, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
गॅस सिलेंडर व पेट्रोल-डिझेल साठा मुबलक; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

जळगाव, 27 मार्च: जळगाव जिल्ह्यातील एलपीजी गॅस सिलेंडर तसेच पेट्रोल-डिझेल इंधनाचा साठा आणि त्याचे सुरळीत वितरण सुनिश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी अर्चना मोरे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी उमा खापरे, सर्व गॅस एजन्सी धारक, पेट्रोल पंप डीलर्स, तेल कंपन्यांचे विक्री अधिकारी तसेच संबंधित विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक –

बैठकीत जिल्ह्यातील एलपीजी गॅस सिलेंडरच्या उपलब्ध साठ्याची सद्यस्थिती तपासण्यात आली. भविष्यातील मागणी लक्षात घेऊन पुरवठ्याचे सुयोग्य नियोजन करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शासनाने निश्चित केलेल्या प्राधान्यक्रमानुसारच गॅस सिलेंडरचे वितरण करण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले. तसेच केटरर्स, हॉटेल व्यावसायिक व एमआयडीसीतील उद्योजकांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर सकारात्मक मार्ग काढण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

यावेळी पेट्रोल व डिझेलच्या साठा व वितरणाचाही आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा व नियमित साठा उपलब्ध असून इंधन पुरवठा साखळी सुरळीतपणे सुरू असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले की, समाजमाध्यमांवर पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या संदेशांवर विश्वास ठेवू नये. जिल्ह्यात इंधनाचा किंवा गॅसचा कोणताही तुटवडा नसून नागरिकांनी घाबरून न जाता दैनंदिन गरजेनुसारच खरेदी करावी. अनावश्यक गर्दी किंवा जादा साठा करून ठेवण्याचे टाळावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागांना गॅस व इंधन साठा आणि वितरणावर सतत लक्ष ठेवण्याचे तसेच कोणत्याही तांत्रिक किंवा वितरणातील अडचणी तातडीने सोडवण्याचे निर्देश दिले. जिल्ह्यात गॅस व इंधनाचा पुरवठा विनाव्यत्यय आणि पारदर्शक पद्धतीने सुरू ठेवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचेही या बैठकित सांगण्यात आले.

हेही वाचा: “शेतरस्ता अडवाल तर महागात पडेल, अन्…..!”, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय, काय आहे संपुर्ण बातमी?

बातमी शेअर करा !
Share
Tags: fuel review meetingias rohan ghugejalgaon collector officejalgaon newsLPG gas cylinderspetrol and diesel

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उष्माघातामुळे 22 वर्षीय युवकाचा मृत्यू; चोपडा तालुक्यातील घटना

उष्माघातामुळे 22 वर्षीय युवकाचा मृत्यू; चोपडा तालुक्यातील घटना

May 12, 2026
नागरिकांनी सतर्क राहावे; पुढील चार दिवस उष्णतेची तीव्र लाट, उत्तर-मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी

नागरिकांनी सतर्क राहावे; पुढील चार दिवस उष्णतेची तीव्र लाट, उत्तर-मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी

May 12, 2026
Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषदेत एकूण 97 कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने बदली

Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषदेत एकूण 97 कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने बदली

May 11, 2026
Placement Drive: बोदवड येथे 15 मे रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन; उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Placement Drive: बोदवड येथे 15 मे रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन; उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

May 11, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच सर्वसमावेशक विकास शक्य – मंत्री संजय शिरसाट

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच सर्वसमावेशक विकास शक्य – मंत्री संजय शिरसाट

May 11, 2026
‘बालस्नेही’ आणि ‘जलसमृद्धी’मध्ये महाराष्ट्रातील ‘या’ दोन ग्रामपंचायती देशात प्रथम, मिळणार 1 कोटी रुपयांचा पुरस्कार

‘बालस्नेही’ आणि ‘जलसमृद्धी’मध्ये महाराष्ट्रातील ‘या’ दोन ग्रामपंचायती देशात प्रथम, मिळणार 1 कोटी रुपयांचा पुरस्कार

May 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page