• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

वीर जवान तुझे सलाम! शहीद जवान बापू कोळी यांना अखेरचा निरोप; लोहारीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 30, 2026
in पाचोरा, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
वीर जवान तुझे सलाम! शहीद जवान बापू कोळी यांना अखेरचा निरोप; लोहारीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पाचोरा, 30 मार्च: पाचोरा तालुक्यातील लोहारी येथील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील (CISF) जवान बापू कोळी यांना कर्तव्य बजावताना वीरमरण आले असून, त्यांच्या पार्थिवावर आज लोहारी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत साश्रुपूर्ण नयनांनी या वीर जवानाला अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी ‘अमर रहे… अमर रहे… बापुदादा… अमर रहे!’ अशा घोषणा देण्यात आल्या.

शहीद जवान बापू कोळी यांना अखेरचा निरोप –

बापू कोळी यांचे 27 मार्च रोजी पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे विधानसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी जात असताना निधन झाले. नाशिक येथून त्यांची जलपाईगुडी येथे निवडणूक कर्तव्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती. रेल्वेने प्रवास करत असताना जलपाईगुडीजवळ त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले.

वीर जवान बापू कोळी यांचे पार्थिव पश्चिम बंगालमधून विशेष विमानाने मुंबई विमानतळावर आणण्यात आले. त्यानंतर 30 मार्च रोजी सकाळी त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी लोहारी (ता. पाचोरा) येथे दाखल झाले. गावात पार्थिव पोहोचताच ते त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले आणि विधीवत पूजा करण्यात आली.

यानंतर तिरंग्यात लपेटलेले पार्थिव फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरवर ठेवून वीरजवान बापू कोळी यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी ‘अमर रहे… अमर रहे… बापुदादा… अमर रहे!’ अशा घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, अमरधाम परिसरात उभारण्यात आलेल्या विशेष चौथाऱ्यावर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात मानवंदना देण्यात आली. यानंतर त्यांच्या मुलाने पित्याच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.

वीर जवान यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी खासदार स्मिता वाघ यांच्यावतीने भैरवी वाघ पलांडे, पाचोरा-भडगावचे आमदार किशोर आप्पा पाटील यांचावतीने सुमित किशोरआप्पा पाटील. तसेच भाजप नेत्या वैशालीताई सूर्यवंशी, माजी आमदार दिलीप वाघ, पाचोरा तहसिलदार विजय बनसोडे, पिपळगाव हरे. सपोनि कल्याणी वर्मा, जिल्हा सैनिक अधिकारी विश्वनाथ उगले, सीआएसएफचे सहायक उपनिरीक्षक एम.के.पाटील, डी.बी.मोरे, लोहारीच्या सरपंच रंजना पाटील, ग्रामपंचायत अधिकारी, तलाठी तसेच पोलीस पाटील, भाजपचे सुभाष पाटील, पं.स. सभापती डॉ. भरत पाटील, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्यासह ग्रामस्थ, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, तसेच तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

24 वर्षे बजावली देशसेवा –

बापू कोळी यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे लोहारी गावासह पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. 2 ऑगस्ट 2002 रोजी त्यांनी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (CISF) प्रवेश घेतला होता. तब्बल 24 वर्षे त्यांनी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने देशसेवा बजावत आपले कर्तव्य पार पाडले. सध्या ते नाशिक येथील नोटप्रेसमध्ये कार्यरत होते. अत्यंत गरिबीच्या परिस्थितीतून पुढे येत, जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या जोरावर त्यांनी ही नोकरी मिळवली होती.

हेही वाचा: 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात प्रथम; मुख्यमंत्री यांच्या हस्ते रोहन घुगेंचा गौरव

बातमी शेअर करा !
Share
Tags: cisf jawan bapu koli crematedmarathi newsmartyred cisf jawan bapu kolipachora taluka latest news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यात चारा साक्षरता व संवर्धन अभियानाचा पहूर येथून शुभारंभ

जळगाव जिल्ह्यात चारा साक्षरता व संवर्धन अभियानाचा पहूर येथून शुभारंभ

October 9, 2026
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर अनंतात विलीन; पुण्यातील डोणजे गावात शासकीय इतमामात पार पडले अंत्यसंस्कार

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर अनंतात विलीन; पुण्यातील डोणजे गावात शासकीय इतमामात पार पडले अंत्यसंस्कार

October 9, 2026
मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

October 8, 2026
महाराष्ट्राच्या दुष्काळी परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांकडून अमित शाह यांना माहिती; केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी

महाराष्ट्राच्या दुष्काळी परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांकडून अमित शाह यांना माहिती; केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी

October 7, 2026
Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषद येथे शिक्षक समायोजन व पदस्थापना प्रक्रिया यशस्वी

Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषद येथे शिक्षक समायोजन व पदस्थापना प्रक्रिया यशस्वी

October 7, 2026
Jalgaon News: सेवा संकल्प अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन

Jalgaon News: सेवा संकल्प अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन

October 7, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page