ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 26 ऑगस्ट : पाचोरा नगरपरिषदेअंतर्गत पाचोरा शहरासाठी नव्याने मंजूर झालेल्या सुमारे 7 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन केले जाणार आहे. आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते उद्या रविवारी 27 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता हा भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी पाचोरा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक शोभा बाविस्कर यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती राहणार आहे.
भूमिपूजन कार्यक्रमाच्या पुढीलप्रमाणे असणार आहे –
- सकाळी 11 वाजता प्रोफेसर कॉलनी, दत्तू टायर येथे रस्ता काँक्रिटीकरण करणे,
- 11.15 वाजता तलाठी कॉलनी ओपन स्पेस भूमिपूजन,
- 11.13 वाजता कॉलेज चौक येथील रस्ता काँक्रिटीकरण करणे,
- 11.45 वाजता तहसीलदार निवास भूमिपूजन रेस्ट हाऊस,12.00 अरिहंत नगर आणि आदर्श नगर ,
- 12.15, पुनगाव रोड, गणपती नगर ,
- 12.30 पुनगाव रोड, स्वामी समर्थ नगर
- 12.45 पुनगाव रोड, तात्यासाहेब आर. ओ. पाटील नगर,
- 1 वाजता पंचमुखी हनुमान रोड, माहेजी नाका रोड रस्ता काँक्रिटीकरण
- यासह दुपारी 1.30 वाजता जारगाव येथील व्यायाम शाळा साहित्य लोकार्पण या कामांचा समावेश आहे.
यावेळी शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, तालुका प्रमुख सुनिल पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा उपजिल्हा प्रमुख गणेश पाटील, पाचोरा शहरप्रमुख किशोर बारावकर, बंडू चौधरी, चंद्रकांत धनवडे, पंढरीनाथ पाटील यांचेसह सर्व आजी माजी नगरसेवक, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती असणार आहे. यावेळी प्रभागातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
पाचोरा शहरातील या भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर ही सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर पाचोरा शहराच्या विकासात आणखी भर पडणार, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.