पाचोरा, 20 एप्रिल: सध्यास्थितीत सहकारी पतसंस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असताना देखील पाचोऱ्यातील संत नरहरी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेने 25 वर्ष पुर्ण करत कौतुकास्पद कार्य केल्याचे गौरवोद्गार आमदार किशोर आप्पा पाटील यांनी काढले. संत नरहरी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त ते बोलत होते. यावेळी आमदारी पाटील यांनी संस्थेचे आजी-माजी चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ तसेच सभासदांचे अभिनंदन करत संस्थेच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
संत नरहरी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव साजरा –
पाचोरा शहरातील संत नरहरी महाराज नागरी सहकरी पतसंस्थेला काल 20 एप्रिल रोजी 25 वर्ष पुर्ण झाली. यानिमित्ताने पाचोरा शहरातील अहिर सुवर्णकार मंगलकार्यालात संस्थेचा रौप्य महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला पाचोरा-भडगावचे आमदार किशोर आप्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. शहरातील संत नरहरी महाराज नागरी सहकरी पतसंस्थेला 25 वर्ष झाल्यानिमित्त आमदार किशोर आप्पा पाटील संस्थेच्या कार्याचा गौरव करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सहकार भारतीचे राष्ट्रीय मंत्री दिलीप पाटील, सहकार क्षेत्रातील शशिकांत साळुंखे, सहकारी संस्थांचे जळगाव जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने, सी.ए. आर.डी. जैन, पाचोरा येथील सहाय्यक निबंधक महेश कासार, आदींनी कार्यक्रमाला उपस्थित राहत मनोगत व्यक्त केले. यावेळी संस्थेतील सभासदांना प्रातिनिधीक स्वरूपात भेटवस्तू देण्यात आल्या.
संस्थेचे चेअरमन विष्णू सोनार यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या मागील 25 वर्षांच्या वाटचालीबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेष्ठ पत्रकार सी.एन. चौधरी यांनी तर आभार अॅड. मंगल मोरे यांनी मानले. या कार्यक्रमाला संत नरहरी महाराज नागरी सहकरी पतसंस्थेचे आजी-माजी चेअरमन, संचालक मंडळ, सभासद तसेच पाचोऱ्यातील अहिर सुवर्णकार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा: जळगाव जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला ‘आपत्ती प्रतिसाद किट’; प्रशिक्षण कार्यशाळेतून सज्जतेला बळ






