• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

VIDEO | श्रीकांत धिवरे जळगावचे नवे पोलीस अधीक्षक; डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याकडून स्वीकारला पदभार

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 21, 2026
in जळगाव जिल्हा, खान्देश, जळगाव शहर, ताज्या बातम्या, धुळे
VIDEO | श्रीकांत धिवरे जळगावचे नवे पोलीस अधीक्षक; डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याकडून स्वीकारला पदभार

जळगाव, 21 एप्रिल: राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलीस दलात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुणे येथे बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीकांत धिवरे यांनी आज, 21 एप्रिल रोजी दुपारी डॉ. रेड्डी यांच्याकडून पदभार स्वीकारला.

श्रीकांत धिवरे जळगावात रुजू –
धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले श्रीकांत धिवरे यांनी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर होत मावळते एसपी डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याकडून अधिकृतपणे पदभार स्वीकारला. त्यांच्या नेतृत्वाखाली जळगाव पोलीस दल अधिक सक्षम आणि गतिमान होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)

श्रीकांत धिवरे हे 2014 बॅचचे आयपीएस अधिकारी असून त्यांनी यापूर्वी विविध महत्त्वाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. धुळेपूर्वी त्यांनी पुणे लोहमार्ग पोलीस, गडचिरोली येथे पोलीस उपअधीक्षक, नवी मुंबई येथे उपायुक्त, बीड येथे अप्पर पोलीस अधीक्षक तसेच नागपूर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (ACB) कार्य केले आहे.

डॉ. महेश्वर रेड्डी यांना निरोप –
जळगाव जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख म्हणून कार्यरत असलेले डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुणे येथे राज्य गुन्हे अन्वेषण विभागात बदली करण्यात आली आहे. या निमित्ताने आज जळगाव पोलीस दलात पदभार हस्तांतरण सोहळा पार पडला. यावेळी डॉ. रेड्डी यांना निरोप देण्यात आला.

त्यांच्या कार्यकाळात केलेल्या उल्लेखनीय आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच त्यांच्या पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

राज्यातील 9 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या खालीलप्रमाणे –

  1. तुषार दोशी यांची सातारा येथून सांगली येथे पोलीस अधीक्षक म्हणून बदली
  2. निखिल पिंगळे यांची पुणे येथील पोलीस उपआयुक्त पदावरून सातारा येथे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती
  3. संदीप घुगे यांना सांगलीवरून मुंबईतील राज्य गुप्तवार्ता विभागात पोलीस उपआयुक्त (सुरक्षा) म्हणून नियुक्त
  4. योगेश गुप्ता यांना कोल्हापूरवरून गडचिरोली परिक्षेत्रात पोलीस उपमहानिरीक्षक (अतिरिक्त जबाबदारी) म्हणून नियुक्ती
  5. निलोत्पल यांची गडचिरोलीवरूनकोल्हापूर येथे अधीक्षक म्हणून बदली
  6. एम. रमेश यांची अतिरिक्त पोलिस अधीक्षक पदावरून गडचिरोलीच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  7. डॉ. महेश्वर रेड्डी यांची जळगाववरून पुण्यातील राज्य गुन्हे अन्वेषण विभागात बदली
  8. श्रीकांत धिवरे यांची धुळेवरून जळगाव येथे अधीक्षक म्हणून नियुक्ती
  9. राजकुमार शिंदे यांना पुणेयेथून वाशीम येथे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती

हेही वाचा: उन्हाळ्यात पाणी व वीजपुरवठा अखंडितपणे सुरु ठेवावा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

बातमी शेअर करा !
Share
Tags: ips dr maheshwar reddyips shrikant dhivarejalgaon newsjalgaon spsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दप्तराचे ओझे कमी करा! ‘स्कूल बॅग पॉलिसी 2020’च्या अंमलबजावणीचे निर्देश

दप्तराचे ओझे कमी करा! ‘स्कूल बॅग पॉलिसी 2020’च्या अंमलबजावणीचे निर्देश

September 5, 2026
उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

September 5, 2026
जळगाव जिल्ह्यात स्वच्छ, सुंदर व हरित उपक्रम; प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापनाचे निर्देश

जळगाव जिल्ह्यात स्वच्छ, सुंदर व हरित उपक्रम; प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापनाचे निर्देश

September 5, 2026
“शहीद जवान अमर रहे”! शासकीय इतमामात सेवारत सैनिक लान्स नायक रोहित पाटील यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप

“शहीद जवान अमर रहे”! शासकीय इतमामात सेवारत सैनिक लान्स नायक रोहित पाटील यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप

September 5, 2026
शेतशिवार हिरवेगार होणार; जामनेर-पाचोरा तालुक्यातील 1 हजार 395 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार

शेतशिवार हिरवेगार होणार; जामनेर-पाचोरा तालुक्यातील 1 हजार 395 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार

September 5, 2026
आरोग्यसेवांच्या गुणवत्तेवर आता स्टार रेटिंगची नजर – मंत्री प्रकाश आबिटकर

आरोग्यसेवांच्या गुणवत्तेवर आता स्टार रेटिंगची नजर – मंत्री प्रकाश आबिटकर

September 4, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page