• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

वाहतूक कोंडीनं काल महिला संतापली अन् मंत्री गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले की, “पुढील काळात अशा प्रकारची……..”

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 22, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
वाहतूक कोंडीनं काल महिला संतापली अन् मंत्री गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले की, “पुढील काळात अशा प्रकारची……..”

मुंबई, 22 एप्रिल: केंद्रातील मोदी सरकारने महिला आरक्षणासंदर्भातील घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडले होते; मात्र ते नामंजूर झाल्यानंतर विरोधकांविरोधात देशभरात आंदोलन करण्यात आले. मुंबईतील वरळी येथेही भाजपकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चामुळे सायंकाळच्या वेळेत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आणि नागरिक व प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.

दरम्यान, एका महिलेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला, ज्यामध्ये ती मंत्री गिरीश महाजन आणि पोलिसांनाही खडसावताना दिसली. या घटनेवर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले मंत्री गिरीश महाजन? –

मंत्रालयात माध्यमांसोबत बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, वाहतूक कोंडीमुळे संबंधित महिला त्रस्त झाल्या होत्या. मोर्चांमुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन सामान्य नागरिकांना गैरसोय होते, हे मान्यच आहे. मात्र, त्या वेळी संबंधित महिला अत्यंत अयोग्य भाषेत बोलत होत्या आणि त्यांनी महिला पोलिसांशीही गैरवर्तन केल्याचे सांगण्यात आले.

मंत्री गिरीश महाजन यांनी पुढे सांगितले की, ते त्या महिलेला समजावत होते आणि “आम्ही 10-15 मिनिटांत निघून जाऊ” असेही त्यांनी स्पष्ट केले होते. तरीही त्या महिलेने बाटली फेकल्याचा आणि अयोग्य भाषेचा वापर केल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, पुढील काळात अशा प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी काळजी घेतली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

नेमकं प्रकरण काय? –

वरळीच्या जांबोरी मैदानातून महिला आरक्षणासंदर्भातील घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर विरोधकांविरोधात निघालेला मोर्चा हा एनएससीआय डोमपर्यंत गेला, मात्र या मोर्चामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झाला. शाळेतून सुटलेल्या मुलांना घेण्यासाठी आलेल्या पालकांनाही अडचणींचा सामना करावा लागला. संबंधित महिला आपल्या मुलाला घेण्यासाठी आली होती, पण दीर्घकाळ वाहतूक कोंडीत अडकल्याने तिला मुलाची बस दिसत नव्हती. मुलाबद्दलच्या काळजीतून तिचा संताप वाढत गेला.

या परिस्थितीत, आई म्हणून मुलाच्या सुरक्षिततेची चिंता करत तिने मोर्चाविरोधात संताप व्यक्त केला. तिने पोलिसांकडे तसेच मोर्चाच्या नेतृत्वाकडेही तक्रार मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने तिचा राग अनावर झाला. अखेर तिने गिरीश महाजन यांच्यासमोर थेट नाराजी व्यक्त करत, “असा मोर्चा काढून वाहतूक कोंडी का करता?” असा सवाल उपस्थित केला. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

हेही वाचा:  VIDEO | जळगाव जिल्हा परिषदेच्या तत्कालीन CEO मिनल करनवाल यांना ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता’ पुरस्कार प्रदान

बातमी शेअर करा !
Share
Tags: bjp morcha in worlimarathi newsminister girish mahajansuvarna khandesh livewoman outraged by traffic jam

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यभरात एसटी बसस्थानकांवर 125 ‘हिरकणी कक्ष’ उभारले जाणार

राज्यभरात एसटी बसस्थानकांवर 125 ‘हिरकणी कक्ष’ उभारले जाणार

September 16, 2026
खनिजांची चोरी आणि गळती रोखण्यासाठी डिजिटल प्रणालीचा होणार वापर; ‘महाखनिज 2.0’ प्रणालीचे CM देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

खनिजांची चोरी आणि गळती रोखण्यासाठी डिजिटल प्रणालीचा होणार वापर; ‘महाखनिज 2.0’ प्रणालीचे CM देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

September 16, 2026
राज्यातील शेत व पाणंद रस्त्यांचे डिजिटल मॅपिंग करून ‘महापाणंद ग्रिड’ उभारणार

राज्यातील शेत व पाणंद रस्त्यांचे डिजिटल मॅपिंग करून ‘महापाणंद ग्रिड’ उभारणार

September 16, 2026
राज्यातील नद्यांच्या संवर्धनासाठी नदी संवर्धन अभियान राबविण्यात येणार – मंत्री गिरीश महाजन

राज्यातील नद्यांच्या संवर्धनासाठी नदी संवर्धन अभियान राबविण्यात येणार – मंत्री गिरीश महाजन

September 16, 2026
पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

September 14, 2026
“….ही शक्यतो माझी शेवटची भेट असू शकते!”, अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील यांची मराठा समाजाला भावनिक साद

“….ही शक्यतो माझी शेवटची भेट असू शकते!”, अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील यांची मराठा समाजाला भावनिक साद

September 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page