ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 8 मे: पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर येथे निष्पाप तीन वर्षीय चिमुरडीवर झालेल्या अमानुष अत्याचार व तिच्या निर्घुण हत्येच्या घटनेने पाचोरा तालुक्यातुन तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या क्रूर घटनेच्या निषेधार्थ पाचोरा तालुका शिवसेना महिला आघाडीच्यावतीने या घटनेतील आरोपीला फाशीची तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात शिवसेना पाचोरा तालुका महिला आघाडीच्या पदाधिकारी सहभागी झाल्या होत्या.

यावेळी पाचोरा उपविभागीय अधिकारी भुषण अहिरे, तहसीलदार विजय बनसोडे, पोलीस निरीक्षक राहुल पवार यांना शिवसेना पाचोरा तालुका महिला आघाडीच्यावतीने निवेदन ललिता पाटील जिल्हाप्रमुख, वंदनाताई पाटील, मंदाताई पाटील उपजिल्हाप्रमुख, बेबाताई पाटील उपजिल्हा समन्वयक, जयश्री येवले उपजिल्हा संघटक, मंदाकिनी पारोचे शहर प्रमुख, अनिता पाटील शहर प्रमुख, वर्षाताई ब्राह्मणे नगरसेविका, मनीषाताई बाविस्कर नगरसेविका यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

निवेदनाद्वारे आरोपीस फाशीच्या शिक्षेची मागणी –
या निवेदनात या अमानुष घटनेचा तीव्र निषेध नोंदविता आरोपीवर कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करण्यासाठी स्वतंत्र विशेष तपास पथक नेमण्यात यावे. जलद गती न्यायालयात खटला चालून आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी ठाम मागणी यावेळेस करण्यात आली.






