• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

नीट पेपरफुटी प्रकरण; लातूरच्या प्रसिद्ध ‘आरसीसी’ कोचिंगचा संचालक शिवराज मोटेगावकरला सीबीआयकडून अटक

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 18, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या, देश-विदेश
नीट पेपरफुटी प्रकरण; लातूरच्या प्रसिद्ध ‘आरसीसी’ कोचिंगचा संचालक शिवराज मोटेगावकरला सीबीआयकडून अटक

पुणे, 18 मे: वैद्यकीय प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई करत लातूरमधील प्रसिद्ध ‘आरसीसी’ कोचिंग क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकरला आज सोमवारी अटक केली. या प्रकरणात मोटेगावकरचा सक्रिय सहभाग असल्याचे पुरावे सीबीआयला मिळाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या अटकेमुळे महाराष्ट्रातील सहा जणांचा या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.

काय आहे संपुर्ण बातमी? –

नीट पेपरफुटी प्रकरणात नाशिकचा शुभम खैरनार याने नीटचा पेपर फोडल्याचा आरोप आहे. त्यानंतर धनंजय लोखंडे याने विद्यार्थ्यांना तो पेपर विकल्याचे सांगितले जात आहे. विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी पुण्यातील मनीषा वाघमारे हिने सांभाळली होती. तसेच लातूरमधील पी. व्ही. कुलकर्णी आणि पुण्यातील मनीषा मांढरे हे दोघे NTA च्या पेपर सेटिंग कमिटीचे सदस्य असून, त्यांच्यावरही पेपरफुटीचे आरोप आहेत.

….अन् शिवराज मोटेगावकरला सीबीआयच्या जाळ्यात –

सीबीआयच्या तपासात फुटलेला पेपर परीक्षेच्या दोन आठवडे आधीच शिवराज मोटेगावकर याच्याकडे असल्याची माहिती समोर आली आहे. नीट परीक्षा झाल्यानंतर मोटेगावकरने एका विद्यार्थिनीसोबत व्हिडीओ तयार केला होता. या व्हिडीओमध्ये परीक्षेत आलेले प्रश्न आपल्या क्लासमध्ये आधीच शिकवले होते, असा दावा करण्यात आला होता. याच व्हिडीओमुळे सीबीआयला संशय आला.

सीबीआयने आधी अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतही मोटेगावकर याचे नाव समोर आले. त्यानंतर सीबीआयच्या पथकाने लातूरमध्ये धाड टाकून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या मोबाईलमध्ये संशयास्पद चॅट आणि काही महत्त्वाचे संपर्क क्रमांक आढळल्याने त्याला सीबीआयकडून अटक करण्यात आली. मोटेगावकर याची तब्बल ११ तास कसून चौकशी केल्यानंतर, त्याच्याविरोधात ठोस पुरावे मिळाल्याने सीबीआयने ही कारवाई करण्याचा निर्णय घेतला.

‘लातूर पॅटर्न’मुळे या क्लासचे नाव राज्यभर प्रसिद्ध –

शिवराज मोटेगावकर यांनी २००३ साली ‘रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस’ म्हणजेच ‘आरसीसी’ची स्थापना केली होती. सुरुवातीला केवळ केमिस्ट्री विषय शिकवणाऱ्या या क्लासने नंतर बायोलॉजी आणि फिजिक्सचे शिक्षणही सुरू केले. ‘लातूर पॅटर्न’मुळे या क्लासचे नाव राज्यभर प्रसिद्ध झाले आणि वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांमध्ये यश मिळवून देणारी संस्था म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली.

‘डॉक्टर घडवणारी फॅक्टरी’ म्हणून ओळख असलेल्या संस्थेवर संशयाचे सावट –

आज ‘आरसीसी’च्या महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये शाखा असून हजारो विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. मोठे निकाल, आकर्षक जाहिराती आणि विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा यामुळे हा क्लास लोकप्रिय झाला होता. मात्र, आता नीट पेपरफुटी प्रकरणात नाव समोर आल्याने ‘डॉक्टर घडवणारी फॅक्टरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या संस्थेवर संशयाचे सावट आले आहे.

 हेही वाचा: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा नीट पेपरफुटीवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला; पंतप्रधान मोदींना विचारले 3 प्रश्न

बातमी शेअर करा !
Share
Tags: CBImarathi newsNEET paper leak casercc coachingshivraj motegaonkarsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्यात दुष्काळी पंचनामे अंतिम टप्प्यात; येत्या दोन दिवसांत काम पूर्ण करण्याचे नियोजन, तहसीलदार विजय बनसोडे यांची माहिती

पाचोऱ्यात दुष्काळी पंचनामे अंतिम टप्प्यात; येत्या दोन दिवसांत काम पूर्ण करण्याचे नियोजन, तहसीलदार विजय बनसोडे यांची माहिती

October 10, 2026
जळगाव जिल्ह्यात चारा साक्षरता व संवर्धन अभियानाचा पहूर येथून शुभारंभ

जळगाव जिल्ह्यात चारा साक्षरता व संवर्धन अभियानाचा पहूर येथून शुभारंभ

October 9, 2026
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर अनंतात विलीन; पुण्यातील डोणजे गावात शासकीय इतमामात पार पडले अंत्यसंस्कार

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर अनंतात विलीन; पुण्यातील डोणजे गावात शासकीय इतमामात पार पडले अंत्यसंस्कार

October 9, 2026
मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

October 8, 2026
महाराष्ट्राच्या दुष्काळी परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांकडून अमित शाह यांना माहिती; केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी

महाराष्ट्राच्या दुष्काळी परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांकडून अमित शाह यांना माहिती; केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी

October 7, 2026
Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषद येथे शिक्षक समायोजन व पदस्थापना प्रक्रिया यशस्वी

Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषद येथे शिक्षक समायोजन व पदस्थापना प्रक्रिया यशस्वी

October 7, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page