• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Breaking News! लाचखोरी प्रकरणातील आरोपी उपनिबंधकाच्या लॉकरमध्ये सापडलं मोठं घबाड; जळगाव ACB ची मोठी कारवाई

लाचखोरी प्रकरणातील आरोपी उपनिबंधकाच्या लॉकरमधून तब्बल १ कोटी ७ लाख ४४ हजार ७५ रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम जप्त

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 22, 2026
in जळगाव जिल्हा, खान्देश, ताज्या बातम्या, ब्रेकिंग
Breaking News! लाचखोरी प्रकरणातील आरोपी उपनिबंधकाच्या लॉकरमध्ये सापडलं मोठं घबाड; जळगाव ACB ची मोठी कारवाई

जळगाव, 22 मे: जळगाव येथील उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयातील उपनिबंधक जगदीश बाबुराव बारी याच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) केलेल्या कारवाईत मोठा मुद्देमाल उघडकीस आला आहे. कॉसमॉस बँक, भुसावळ येथील लॉकरची पंचांसमक्ष झडती घेतली असता तब्बल १ कोटी ७ लाख ४४ हजार ७५ रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

नेमकी बातमी काय? –

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २० मे २०२६ रोजी जगदीश बारी यांच्यावर यशस्वी सापळा कारवाई केली होती. त्यानंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाच्या कलम ७ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयाने २३ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, घर झडतीदरम्यान बारी यांचे कॉसमॉस बँकेत लॉकर असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याची तपासणी करण्यात आली. या झडतीत ६६०.३३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे हार, बांगड्या आणि सोन्याचे बिस्किट असा ९९ लाख ४ हजार ९६० रुपयांचा ऐवज आढळून आला. तसेच ८ लाख ३६ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम, ज्यामध्ये सर्व ५०० रुपयांच्या नोटा होत्या, तीही जप्त करण्यात आली. याशिवाय १०.५०० ग्रॅम वजनाचे २ हजार ६२५ रुपयांचे चांदीचे दागिने मिळून आले.

लॉकरमधून जप्त करण्यात आलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत १ कोटी ७ लाख ४४ हजार ७५ रुपये इतकी असल्याचे ACB ने स्पष्ट केले आहे. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

यांनी केली कारवाई –

या कारवाईदरम्यान लॉकर झडती पथकात पोलीस पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांच्यासह पोउनि सुरेश पाटील, महिला पोलीस हवालदार संगिता पवार, पोलीस अंमलदार प्रदीप पोळ, मनोज पाटील, अमोल सुर्यवंशी आणि चंद्रशेखर चौधरी यांनी सहभाग घेतला. सर्व अधिकारी व कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे कार्यरत आहेत.

हेही वाचा: राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक संपन्न; कृषी क्षेत्रातील डिजिटायझेशनवर विशेष भर

बातमी शेअर करा !
Share
Tags: deputy registrar bribery casejalgaon acbjalgaon newslockersuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोरा-भडगाव मतदारसंघातील वीज समस्यांवर तोडगा काढण्यासाठी उद्या १३ जुलैला बैठक;  नागरिकांच्या तक्रारींवर होणार थेट चर्चा

पाचोरा-भडगाव मतदारसंघातील वीज समस्यांवर तोडगा काढण्यासाठी उद्या १३ जुलैला बैठक;  नागरिकांच्या तक्रारींवर होणार थेट चर्चा

July 12, 2026
VIDEO | ‘तणनाशकाचा परिणामच झाला नाही’; नांद्रा येथील शेतकऱ्याची पाचोरा तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी

VIDEO | ‘तणनाशकाचा परिणामच झाला नाही’; नांद्रा येथील शेतकऱ्याची पाचोरा तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी

July 11, 2026
सुरक्षित, सक्षम आणि विकसित महाराष्ट्रासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सुरक्षित, सक्षम आणि विकसित महाराष्ट्रासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

July 10, 2026
पावसाळी अधिवेशनाचा समारोप; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी घोषणा

पावसाळी अधिवेशनाचा समारोप; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी घोषणा

July 10, 2026
महाराजस्व अभियानांतर्गत प्रत्येक मतदारसंघात महाशिबिराचे आयोजन; लाखो कुटुंबांना मिळणार थेट लाभ – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

महाराजस्व अभियानांतर्गत प्रत्येक मतदारसंघात महाशिबिराचे आयोजन; लाखो कुटुंबांना मिळणार थेट लाभ – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

July 10, 2026
आदिवासींना हक्काचा सातबारा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची अधिवेशनात मोठी घोषणा

आदिवासींना हक्काचा सातबारा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची अधिवेशनात मोठी घोषणा

July 9, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page